अवकाळी पाऊस, बोगस बियाणे प्रकरणी शिवसेनेतर्फे कृषि मंत्री यांना निवेदन.

63

मूल.
गेल्या काही दिवसांपूर्वी तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने धान पिकाचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्याकरिता महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दादासाहेब भुसे पाटील तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार मुल येथे दाखल झाले. नुकसानग्रस्त धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ मिळावी म्हणून तालुका शिवसेनेतर्फे शिवसेना जिल्हा प्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांचे प्रमुख उपस्थिती मधे माजी शिवसेना तालुकाप्रमुख श्री. प्रशांत गटूवार यांनी शेतकऱ्यांसोबत कृषिमंत्री दादासाहेब भूसे जी यांना मागण्यांचे निवेदन दिले.

मुल तालुका हा धान उत्पादक तालुका म्हणून विदर्भात परिचित आहे. येथे मोठ्या प्रमाणात धान पिकाचे उत्पन्न घेतले जाते. खरीप हंगामात शेतकऱ्यांचे धान पीक महत्त्वाचे पीक असून या पिकावरच शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक बजेट अवलंबून असते. गेल्या काही दिवसापूर्वी तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. या अवकाळी पावसाने पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनातर्फे नुकसानीचे सर्वे करण्यात आले. परंतु अजूनही शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली नाही.

तसेच चालू हंगामात खरीप लागवडीकरता धान उत्पादक शेतकरी यांनी कृषी केंद्रातून धानाचे वान खरेदी केले.सदर वान बोगस निघाल्याने संबंधित शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासकीय पातळीवर चौकशी केली. परंतु खरीप हंगाम संपत असतानाही शेतकऱ्यांना सदर कंपनीकडून नुकसान भरपाई मिळाली नाही.ही बाब शेतकऱ्यांच्या बाबतीत गंभीर आहे. या प्रकाराबाबत कृषिमंत्री यांना अवगत करण्यात आले.

याप्रसंगी कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांचेकडून शिवसेना शिष्टमंडळाला संबंधितांवर योग्य ती कारवाई करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.या वेळी माजी युवा सेना तालुका प्रमुख ओमदेव मोहुर्ले,महेश चौदरी माजी संघटक, माजी उपालुका प्रमुख शंकर पाटेवार,सोमेश्वर रेड्डीवार,पवन सोनटक्के,पशांत वनकर,विजय वैरागडे क्षेतकरी, व असंख्य शिवसैनिक आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.