नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी महायुती शासन कटीबध्द – कृषी मंञी दादा भुसे

26

अवकाळी पावसामूळे तालुक्यातील शेतीची बांधावर जावुन पाहणी केली तेव्हा शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याचे दिसुन आले. शासनाच्या वतीने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यात आले असुन लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानीच्या रक्कमा जमा करण्यासाठी महायुती शासन कटीबध्द आहे. असे आश्वासन कृषी व माजी सैनिक कल्याण मंञी ना. दादाजी भुसे यांनी दिले.
अवकाळी पावसामूळे तालुक्यातील अनेक भागातील शेतांची प्रचंड नुकसान झाली आहे. कुटूंबाचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी अहोराञ परीश्रम करून पीक वाचविल्यानंतर ऐन शेवटच्या काळात अवकाळी पाऊस झाल्याने तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. त्यामूळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत द्यावी. अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांची परीस्थिती आणि मागणी लक्षात घेवुन राज्याचे कृषी मंञी दादाजी भुसे यांनी जिल्ह्याचे पालकमंञी विजय वडेट्टीवार यांचे सोबत जिल्ह्याच्या चार तालुक्यातील नुकसानग्रस्त शेताच्या बांधावर जावुन पाहणी केली. तालुक्यातील चिमढा आणि टेकाडी येथे शेतपीकाची पाहणी केल्यानंतर झालेल्या संवाद सभेत बोलतांना ना. दादाजी भुसे यांनी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांवर महायुती शासन अन्याय करणार नसुन विमा कंपन्यांशी चर्चा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याचे निर्देश देणार असल्याचे आश्वासन दिले. मदत व पुनर्वसन मंञी तथा जिल्ह्याचे पालकमंञी ना. विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेले महायुती शासन ९०% अनुदानावर हरभरा, ज्वारी आणि गहु यांचे बीयाणे देण्यासंबंधी विचार करीत असल्याचे सांगीतले. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने शेतकरी कल्याण निधी अंतर्गत वाघाच्या हल्यात मृत्यु पावलेला शेतक-याचा मूलगा रवि चौधरी, कँन्सरग्रस्त शेतकरी यशोदा नामदेव कोटरंगे, प्रभाकर लेनगुरे आणि विनोद वाढई या शेतकऱ्यांना मंञीव्दयांच्या हस्ते धनादेश वितरीत करण्यात आले. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत, जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे, चिमढाचे सरपंच कालीदास खोब्रागडे आणि उपसरपंच योगेश लेनगुरे, टेकाडीचे सरपंच सतीश चौधरी, अरविंद चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष राकेश रत्नावार यांचेसह महसुल व कृषी विभागाचे अनेक अधिकारी, कर्मचारी व काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. तालुक्यातील शेतपीकांची पाहणी केल्यानंतर स्थानिक प्रशासकीय भवनात महसुल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.
कृषी मंञ्यानी केली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची प्रशंसा
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या शेतकरी कल्याण निधी योजनेतंर्गत दुर्धर आजारी व वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक सहकार्य केल्या जाते, ही बाब अभिनंदनीय असुन राज्यातील इतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेतकरी कल्याण निधी योजनेचा पँटर्न राबविला पाहीजे. असे मत व्यक्त करत बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांची प्रशंसा केली.,