एकसंघ झाल्यास ओबीसी क्रांतीचा इतिहास घडु शकतो – प्रा. ज्ञानेश वाकुडकर

45

भविष्यात ओबीसी जनगणना झाली तरी ओबीसींच्या हक्कांना न्याय मिळणार नसून त्यासाठी ओबीसींना आपला शत्रु ओडखणे गरजेचे झाले आहे. ओबीसींची टक्केवारी लक्षात घेवुन येत्या काळात ओबीसींनी एकसंघ होवून प्रस्थापितांविरूध्द लढा पुकारल्यास तामीलनाडू प्रमाणे महाराष्ट्रातही ओबीसी क्रांतीचा इतिहास घडण्यास फार काळ लागणार नाही. त्यामूळे ओबीसींनी येत्या काळात जागृत राहावे. असे आवाहन ओबीसी चळवळीचे खंदे कार्यकर्ते आणि समतावादी हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी व्यक्त केले. ओबीसी संघटना मूलच्या वतीने महात्मा ज्योतीबा फुले यांच्या स्मृतीदिना निमित्य आयोजीत ओबीसी क्रांतीचा लोकजागर या कार्यक्रमात ते बोलत होते. ओबीसी समाज आणि आव्हाणे या विषयावर मार्गदर्शन करतांना प्रा. वाकुडकर यांनी सध्याच्या राजकिय परिस्थितीत ओबीसी न्याय हक्कापासून वंचित असल्याचे मत व्यक्त केले. महात्मा फुले यांचे विचार व ओबीसी समाज या विषयावर मार्गदर्शन करतांना ओबीसी परिषदेचे राज्य अध्यक्ष तथा आरक्षण विश्लेषक प्रा. श्रावण देवरे यांनी बळीराजाच्या राज्यकारभारा प्रकाश टाकतांना मनुवादयांचा खरपुस समाचार घेतला. १९४७ नंतरच्या स्वकियांच्या राज्यात जातनिहाय जनगणना झाली परंतू त्यामध्यें ओबीसीचा उल्लेख नसल्याने ओबीसीची जनगणना झाली नाही. याविषयी खंत व्यक्त करतांना राजकिय क्षेत्रातील ओबीसींचे काही नेेतेच स्वार्थासाठी ओबीसींना न्याय हक्कापासून वंचित ठेवण्याचे कारस्थान रचत असतात. असा आरोप केला. ओबीसी संख्येनी मोठा असला तरी ओबीसींची काही मंडळी वर्तमान परिस्थितीत राजकारणातील वेगवेगळया खुंटाला बांधला असल्याने ओबीसींचा उध्दार रखडत असल्याने त्याविषयी चिंता व्यक्त केली. महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन आणि दिप प्रज्वलन करून जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी मूलच्या नगराध्यक्ष रत्नमाला भोयर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती घनश्याम येनुरकर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमात ओबीसी संघटन मूलचे संयोजक तथा जिल्हा परिषद शिक्षक लक्ष्मण खोब्रागडे यांच्या लिपन या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते पार पडले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, घनश्याम येनुरकर आणि रत्नमाला भोयर यांनीही ओबीसींनी जागृत राहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी ओबीसी संघटनेच्या वतीने प्रा. श्रावण देवरे आणि प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यांत आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पडोळे यांनी केले. लक्ष्मण खोब्रागडे यांनी संचालन व युवराज चावरे यांनी आभार मानले. प्रा. श्रावण देवरे यांचा परिचय सुनिल शेरकी यांनी तर गंगाधर कुनघाडकर यांनी प्रा. वाकुडकर यांचा परिचर करून दिला. कार्यक्रमाला तालुक्यातील ओबीसी बंधु-भगिनी मोठया संख्येनी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जितेंद्र लेनगुरे, जितेंद्र बल्की, प्रभाकर भोयर, नंदकिशोर रणदिवे, प्रशांत समर्थ, राकेश ठाकरे, राकेश रत्नावार, युवराज चावरे, गुरू गुरनूले, बंडु गुरनूले, कैलास चलाख, विवेक मुत्यलवार, गुरूदास चौधरी, सुंदर मंगर, धनराज कुडे, हसन वाढई, आशिष आष्टणकर आदिंनी सहकार्य केले.