Life Certificate | पेन्शनर्ससाठी मोठी खुशखबर ! ‘या’ महत्वाच्या कागदपत्राबाबत मिळाला मोठा दिलासा

66

नवी दिल्ली – पेन्शनर्सला (Pensioners) दरवर्षी आपल्या बँकेत पेन्शन सुरूठेवण्यासाठी लाईफ सर्टिफिकेट (Life Certificate) किंवा हयातीचा दाखला (Jeevan Pramaan Patra) जमा करावे लागते.

लाईफ सर्टिफिकेट (Life Certificate) ते जिवंत असल्याचा पुरावा असतो, जो दरवर्षी बँक, पोस्ट ऑफिस किंवा फायनान्शियल इन्स्टीट्यूटमध्ये जमा करावा लागतो.

ज्यामुळे पेन्शनर्सची पेन्शन जारी राहते. आता तुम्ही बँका आणि पोस्ट ऑफिसद्वारे ही सुविधा घरबसल्या सुद्धा लाईफ सर्टिफिकेट (Life Certificate) जमा करू शकता. लाईफ सर्टिफिकेट जमा करण्यासाठी EPFO शेवटची तारीख ठरवत असे, ज्याच्या आत पेन्शनर्सला हा दाखला जमा करावा लागत होता.

कधीही जमा करू शकता लाईफ सर्टिफिकेट

EPFO ने आता लाईफ सर्टिफिकेट जमा करण्याच्या नियमात एक मोठा दिलासा मिळाला आहे. नवीन नियमांनुसार पेन्शनर्स आता आपल्या सुविधा आणि वेळेच्या हिशेबाने कोणत्याही वेळी हयातीचा दाखला जमा करू शकतात.

याशिवाय याची व्हॅलिडिटी लाईफ सर्टिफिकेट (Life Certificate) जमा करण्याच्या तारखेपासून एक वर्षासाठी व्हॅलिड असेल. उदाहरणार्थ तुम्ही लाईफ सर्टिफिकेट 1 डिसेंबर 2021 ला जमा केले तर याची वैधता 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत राहिल.

जीवन प्रमाण पोर्टलद्वारे असे जनरेट करू शकता सर्टिफिकेट

तुम्ही जीवन प्रमाणपत्र पोर्टल https://jeevanpramaan.gov.in/ वर आपले लाईफ सर्टिफिकेट जमा करू शकता.
यासाठी अगोदर पोर्टलवरून जीवन प्रमाणपत्र डाऊनलोड करावे लागेल. याशिवाय UDAI द्वारे मान्य फिंगरप्रिंट डिव्हाईस पाहिजे.

असे जमा करू शकता लाईफ सर्टिफिकेट