एफ.ई.एस.गल्स॔ महाविद्यालयात संविधान दिन व मतदार नाव नोंदणी,जनजागृति कार्यक्रम संपन्न

37

फिमेल एज्युकेशन सोसायटी चंद्रपुर द्वारा संचालित एफ ई एस गर्ल्स कॉलेज चंद्रपुर येथील रासेयो विभाग द्वारा संविधान दिन व मतदार नाव नोंदणी जनजागृति उपक्रम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ मिनाक्षी ठोंबरे, प्रोफेसर डॉ.मेघमाला मेश्राम मराठी विभाग प्रमुख,प्रा.डाॅ. अंजली ठेपाले,राज्यशास्त्र विभाग, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ राजेंद्र बारसागडे यांची प्रामुख्यानी उपस्थिति होती
ग्रंथपाल डॉ मिनाक्षी ठोंबरे यानी प्रतिपादन केले की संविधान हा देशाचा मोल्यवान ग्रंथ आहे व या नुसार देशाचा राज्यकारभार चालते प्रोफेसर डॉ मेघमाला मेश्राम यानी संविधानाचे उद्देश्य व भुमिका विशद करुण संविधानाच्या उध्देश पत्रिकेचे वाचन करुण उपस्थिताना शपथ दिली, डॉ अंजली ठेपाले यानी संविधानाच्या उध्देश पत्रिकेवर प्रकाश टाकुन सविधानाने स्त्री पुरुष समानता निर्माण केली आणी स्त्रीयाना मतदानाच हक्क दिला असे विचार कार्यक्रमा प्रसंगी माडंले
तर अमर श्रीरामे यानी विद्यार्थिनी ना ज्याचे नाव मतदार यादीत नाही आहे अशा विद्यार्थिनीन कडुन मतदार नोंदणी फार्म भरुन घेतला व मोलाचे मार्गदर्शन केले आणि स्वता फार्म भरुन दिले
कार्यक्रमाचे आयोजन व सुत्र संचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ राजेंद्र बारसागडे यानी केले तर आभार प्रा डॉ राजेश चिमनकर यानी मानले कार्यक्रमाचा शेवट राष्ट गिताने करण्यात आला
कार्यक्रमास प्रा डॉ उमरे, प्रोफेसर डॉ कावळे मॅडम, डॉ जुनघरे मॅडम, डॉ जुमले मॅडम, प्रा बनसोड,प्रा निमगडे तपासे,गोरे,नवले,कामडी,गुरनुले व रासेयो स्वंयसेवीका यांची प्रामुख्यानी कार्यक्रमास उपस्थिती होती