या योजनांमधून मिळणार शेतक-यांना साहित्य

43

या योजनांमधून मिळणार शेतक-यांना साहित्य
मूल:- शासनाच्या वतीने शेतक-याला शेती साहित्य व शेती पूरक उद्योगासाठी अनुदानदेण्यात येते त्यासाठी मागणीची नोंद महाडीबीटीपोर्टलवर करणे गरजेचे आहे.लाॅटरी पध्दतीने निवड करून निवड झालेल्या लाभार्थी शेतक-यांलाकृषी विभागाची पूर्व संमती मिळाल्यानंतर साहित्य खरेदी करणे किंवा प्रकल्पाची उभारणीकरता येते.

लाभार्थी अनुदान हे सरळ शेतक-यांच्याबॅंक खात्यात जमा होते.योजना राबविताना पारदर्शकता राहावी म्हणूनगट सन 2020-21 पासून महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या पुरस्कृत योजनेसाठी सदर योजनाराबविण्यात येत आहे.साहित्य खरेदी केल्यानंतरअनुदानाची रक्कम भेटत असल्याने पूर्ण रकमेची व्यवस्थाकरावी लागत असल्याकारणानेशेतक-यांचा पाहिजे तेवढाप््रतिसाद अजूनही दिसत नाही.शिवाय प्रत्येक साहित्यासाठी शासनाने किंमत निर्धारित केलेली असून अनुदान सुध्दा
त्या तुलनेत दिल्या जाते परंतु बाजारात त्यांची किंमत जास्त असल्याने सुध्दा शेतकरी योजनेचा लाभ घेण्यास असमर्थता दर्शवित आहे.मंजूरी मिळालेल्या ब-याच शेतक-यांनी सुध्दा साहित्याची खरेदी केली नसल्याची सुध्दा वास्तविकता समोर आलेली आहे.

या योजनांमधून मिळणार शेतक-यांना साहित्य:- कृषी यांत्रिकी उपअभियान योजना,राज्य पुरस्कुत कृषी यांत्रिकी करण अभियान योजना,प्रधानमंत्री सुक्ष्म योजना,एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान,राष्ट्रीय कृषि विकास योजना ,राष्ट्रीय अन्न सुरक्षा गळीत धान्य अभियान या योजनाअंतर्गत रोटावेटर,पावर टिलर,पलटी नागर मळणी यंत्र,दाल मिल यासह ठिंबक संच,तुषर संच शेतकरी द्यावयाचे आहे.