MH-CET/JEE/NEET – २०२३ या परिक्षांच्या पूर्व तयारीच्या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी नोंदणीची मुदत दि. ३०-११-२०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

43

समताधिष्ठित आधुनिक भारतीय समाज निर्मितीकरीता थोर महापुरुषांनी आपले आयुष्य वेचले. महात्मा ज्योतीबा फुले हे या समाजक्रांतीचे अग्रदुत होत. समता, न्याय आणि बंधुता या त्रितत्वावर आधारित आधुनिक समाज स्थापनेकरीता त्यांनी स्वतःच्या घरुनंच समाजक्रांतीचे रण फुुुंकले. विषमातावादी आणि परंपरावादी निष्क्रिय भारतीय समाजास समतामूलक तत्वांनी आणि विचारांनी तेजोमय केले. स्त्रिशिक्षण, अस्पृशांना शिक्षण, बालविवाह प्रतिबंधक, विधवा विवाह, शेतीसुधारणा, अनाथाश्रम, भृणहत्या प्रतिबंध, विधवा केशवपन बंदी इत्यादी विविध सामाजिक क्षे़त्रात त्यांनी क्रांतीकारी कार्य केले. एवढेच नाही तर सत्यशोधक समाजाची स्थापना करुन मानवतावादी नवसमाजाची मुहूर्तमेढ रोवली आणि आधुनिक पुरोगामी महाराष्ट्राचे जनक ठरले.

महात्मा ज्योतीबा फुले यांचे आधुनिक समाजाचे स्वप्न पूर्णत्वास नेण्याचा प्रण महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. त्याकरीता इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग या कमकुवत घटकांच्या सर्वसमावेशक सर्वांगीण शाश्वत विकासाकरीता “महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था” (महाज्योती) या स्वायत्त संस्थेची स्थापना ८ ऑगस्ट २०१९ ला करण्यात आली. ही संस्था महाराष्ट्रातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग या घटकांतील सामाजिक, शैेेेेेक्षणिक, आर्थिक विकास, संशोधन, रोजगारभिमुखता वृध्दी, कौशल्य विकास, स्वयंरोजगार, ग्रामीण विकास, शेती विकास, व्यक्तिमत्व विकास , स्पर्धात्मकता विकास, सामाजिक ऐक्य व सलोखा आणि तत्सम क्षेत्रांमध्ये विविध उपक्रम राबवून आधुनिक कटिबद्ध समाज निर्मितीकरीता स्वतःस समर्पित करण्यास कटिबद्ध आहे.Mahatma Jyotiba Phule Reseach & Training Institute, Nagpur
(MAHAJYOTI)

(An Autonomous Institute of The Other Backward Class Bahujan Welfare Department, Govt. of Maharashtra)