E-Shram Card: ‘या’ लोकांनी त्यांचे ई-श्रम कार्ड बनवले पाहिजे, अनेक फायदे मिळणार

48

E-Shram Card Benefits: केंद्र सरकारच्या पुढाकाराने ई-श्रम कार्ड असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना अनेक फायदे देणार आहे. तुम्ही त्यात कार्ड बनवून देखील लाभ घेऊ शकता.

असंघटित कामगारांना मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ई-श्रम पोर्टल सुरू केले आहे.या पोर्टलव्दारे विविध योजनांचा लाभ घेत येणारअसल्याने ई-श्रमकार्ड असंघटित कामकारांकरिता फायद्याचे ठरणार आहे.


शेतमजूर,लहान आणि अल्पभूधारक शेतकरी,आशा कार्यकर्ता,मनरेगा कामगार,भाजी आणि फळ विक्रेता,नाव्ही,घरगुती कामगार,सुतार इमारत आणि बांधकामकामगार आणि इतर कामगारही या ई-श्रम पोर्टलवरनोंदणी करू शकतात.या कार्डमुळे कामगारांना भविष्यात सरकारच्या योजनांचालाभ घेण्यास मदत होईल व कामगारांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत एक वर्षासाठी अपघाती विमाहीमिळणार आहे.त्यामुळे याचा सर्व कामगारांनी लाभ घ्यावा.