चिखली येथील जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांच्या हस्ते माता मंदिराचे लोकार्पण सोहळा व ग्राम पंचायत भवनाचे विस्तारीकरण सभागृहाचे लोकार्पण

62

 

दिनांक : २१ नोव्हेंबर २०२१, रविवार….

मूल तालुक्यातील चिखली येथील जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरणुले यांच्या हस्ते माता मंदिराचे लोकार्पण सोहळा व ग्राम पंचायत विस्तारीकरण सभागृहाचे लोकार्पण उत्साहात पार पडले. हे माता मंदिर माननीय लोकनेते सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या विकास निधीतून बांधण्यात आले. ग्राम पंचायत भवन हे जिल्हा निधीतून देण्यात आले.


यावेळी श्री दुर्वासजी कडस्कर उपसरपंच ग्राम पंचायत चिखली, श्री चंदू नामपल्लीवार जेष्ट कार्यकर्ते राजोली, सौ उर्मिला कडस्कर माजी सरपंच तथा सदस्या, श्री राकेश झोलमवार सदस्य, श्री बबन कडस्कर अध्यक्ष तंटामुक्त समिती, सौ चंदा कडस्कर सदस्या, श्री चंदू येरमे पोलीस पाटील, श्री डोपाजी कडस्कर अध्यक्ष गुरुदेव सेवा मंडळ, श्री उमाजी दादा मंडलवार संचालक गुरुदेव सेवा मंडळ, श्री अशोकजी सुरपाम सामाजिक कडस्कर, श्री पंकज कडस्कर सदस्य, श्री प्रमोद कडस्कर, श्री संतोष कडस्कर व संपूर्ण गावकरी मंडळी उपस्थित होते.
यावेळी मंदिरात भजन ठेऊन पूजन करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षा सौ संध्या गुरनुले यांनी माननीय श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे खूप आभार मानले. आजपर्यंत चिखली गावाला जिल्हा विकास निधीतून तसेच आमदार निधीतून अनेक विकास काम करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे सुधा आपण या गावाच्या विकासासाठी नेहमी तत्पर असल्याचे म्हटले. हे माता मंदिर एक सुंदर मंदिर झाले असून पुन्हा आपण जे लागेल ते या गावाला देऊ असे म्हटले.