मतदार नोंदणीत सहभागी होण्याचे प्रशासनाचे आवाहन. एनसीसी प्रभात फेरीद्वारे जनजागृती.

40
मुल:-  दिनांक 1/1/2022 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 1 नोव्हेंबर 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मतदार जागृती करण्यासाठी व युवकांना मतदार नोंदणीस प्रोत्साहित करण्यासाठी कर्मवीर महाविद्यालय मुल येथील एनसीसी विद्यार्थ्यांनी पथकाची प्रभात फेरी तहसील कार्यालय मुल ते नगर परिषद कार्यालय मुल या मार्गाने आज दिनांक 15 नोव्हेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आली होती.उपविभागीय अधिकारी , तहसीलदार मुल यांनी सदर प्रभात फेरीला हिरवी झेंडी दाखविल्यानंतर सदर फेरी मार्गस्थ झाली.
यावेळी सिद्धार्थ मेश्राम मुख्याधिकारी नगरपरिषद मुल, कारडवार गटविकास अधिकारी पंचायत समिती मुल हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना नमुना- 6 फार्म चे वाटप स्वतः उपविभागीय अधिकारी यांनी करून त्यांना मतदार नोंदणी करण्याचे आवाहन केले. मतदार नोंदणी करण्यासाठी विविध घोषणा देत सदर प्रभातफेरी मूल शहरातुन मार्गस्थ झाली.
नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत मतदार नोंदणी करण्याचा निर्धार व्यक्त केला. नगर परिषद मुल येथे सहभागी विद्यार्थिनींना चहापान देऊन प्रभात फेरी चे विसर्जन करण्यात आले. सदर प्रभातफेरी यशस्वी करण्यासाठी श्री. यशवंत पवार नायब तहसीलदार (निवडणूक), सौ. उज्वला कापगते सहाय्यक प्राध्यापक कर्मवीर महाविद्यालय,  अमोल करपे, महसूल सहाय्यक (निवडणूक), श्री. विलास कागदेलवार नगर परिषद  व पोलीस कर्मचारी यांनी सहकार्य केले.