उद्या शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन

44

चंद्रपूर :-
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत शिक्षक पात्रता परीक्षा (महाटिईटी) दि.२१ नोव्हेंबर २0२१ रोजी आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील १५ परीक्षा केंद्रावर पेपर-१ सकाळी १0.३0 ते १ या कालावधीत तर १४ परीक्षा केंद्रावर पेपर-२ दुपारी २ ते ४.३0 या कालावधीत निश्‍चित केलेल्या केंद्रावर घेण्यात येणार आहे. तरी, सर्व परीक्षार्थींनी आपल्या प्रवेश पत्रात नमूद परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होण्याच्या ३0 मिनिटे अगोदर उपस्थित राहावे. परीक्षा केंद्रात पेपर सुरू होण्यापूर्वी २0 मिनिटे अगोदर प्रवेश देण्यात येईल. प्रवेश केंद्राचे अंतर लक्षात घेऊन परीक्षार्थींनी प्रवासाचे नियोजन करावे असे शिक्षणाधिकारी (प्राथ.) दीपेंद्र लोखंडे यांनी कळविले आहे.


अशी आहेत परीक्षा केंद्रे
महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-१ साठी केंद्र क्र. ७५0१- सरदार पटेल महाविद्यालय,चंद्रपूर, ७५0२- न्यू इंग्लिश हायस्कूल,७५0३, लोकमान्य टिळक विद्यालय, ७५0४- लोकमान्य टिळक कन्या विद्यालय चंद्रपूर,७५0५- रफी अहमद किद्वाई हायस्कूल, ७५१0- जुबली जिल्हा परिषद हायस्कूल, ७५११- एफ.ई.एस. गर्ल्स हायस्कूल, ७५१२-हिंदी सिटी हायर सेकंडरी स्कूल, ७५१३-छोटुभाई पटेल हायस्कूल, ७५१४-नेहरू विद्यालय चंद्रपुर,७५१५ सेंट मायकल इंग्लिश स्कूल, ७५१६-जनता विद्यालय चंद्रपूर,७५१७-भवानजीभाई चव्हाण हायस्कूल, ७५१८- डॉ.आंबेडकर कॉलेज, चंद्रपूर तर ७५१९ माउंट कारमेल कॉन्व्हेंट हायस्कूल, चंद्रपूर यांचा समावेश आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-२ साठी केंद्र क्र. ७५0६-सेंट मायकल सीबीएससी इंग्लिश स्कूल चंद्रपूर, ७५0७- मातोश्री माध्यमिक विद्यालय तुकूम, ७५0८-न्यू इंडिया कॉन्व्हेंट हायस्कूल, ७५0९-विद्या विहार कॉन्व्हेंट हायस्कूल, ७५१0-जुबली जिल्हा परिषद हायस्कूल, ७५११-एफ.ई.एस.गर्ल्स हायस्कूल, ७५१२-हिंदी सिटी सेकंडरी स्कूल, ७५१३-छोटुभाई पटेल हायस्कूल, ७५१४-नेहरू विद्यालय,७५१५-सेंट मायकल इंग्लिश स्कूल,७५१६-जनता विद्यालय, ७५१७-भवानजीभाई चव्हाण हायस्कूल, ७५१८- डॉ.आंबेडकर कॉलेज चंद्रपूर तर ७५१९-माउंट कारमेल कॉन्व्हेंट हायस्कूल यांचा समावेश आहे.