दारूची वाहतूक करणा-या वाहनाला अपघात एक युवक ठार,तर दोघे जखमी

44

मूल:- दारूची अवैद्य विक्री करण्यासाठी दारूघेवून जात असताना एका स्काॅर्पीओचा अपघात होऊन एका युवकाचा मृत्यू झाला तर दोघेजण जखम असल्याचीघटना मूल-ताडाळा मार्गावर महाबिज गोदामाजवळ घडली.जिल्हयातील दारूबंदी उठली असतानाही काही मंडळीअजूनही दारूचा अवैद्य व्यवसाय करीत आहेत.अवैद्यव्यवसायाकरीता तालुक्यातील ग्रामीण भागात
एमएच-29-एडी-0923 क्रमांकाच्या स्काॅर्पीओवहनाने देशी-विदेशी-दारूच्या एकूण 35 पेटया नेत असताना मूल तालूका 3 किती अंतरावर ताडाळामार्गावरील महाबिज गोदामाजवळ हा भीषण अपघात झाला.सदर वाहन मूलवरून भरधाव जात असताना अचानकसमोरचा टायर फुटला.त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि सदर वाहन मार्गाच्याकडेला झाडाला धडकमारून उलटला.अपघाताच्या वेळेस सदर वाहनातचालकासह इतर दोघेजण होते.यापैकी एकाला गंभीर दुखापत झाल्याने त्यालातात्काळ नागपूरला हलविण्यात आले.दरम्यान,नागपूरला नेत असताना युवकाचामृत्यू झाला.इतर दोघे जणही जखमी असून त्यांच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू आहेत.ही घटना घडून दोन दिवस झाले. परंतु,पोलिसांनी अजूनही गुन्हाची नोंद केलेली नाही,हे विशेष.