शेतकरी पुत्रांनीच जाणल्या शेतकर्‍याच्या व्यथा.फवारणीमुळे पीक जळालेल्या शेतकर्‍याला केली स्वखर्चाने दहा हजारांची मदत

32

मुल 

मूल तालुक्यातील फुलझरी गावातील शेतकरी रघुनाथजी मोहूर्ले याचे धान पीक औषध फवारणीमुळे जळाले, दिवाळीच्या समोर गरीब शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले. वर्षभर केलेली मेहनत काही लोकांच्या चुकीमुळे क्षणार्धात मातीमोल होताना दिसली. पण लालफितशाही चा कारभार लांबच लांब असल्यामुळे शेतकरी कोलमडल्यावर आधार देण्याचा सोडून कागदोपत्री कचाट्यात टाकून कधी न्याय मिळेल हे कृषी विभागातील महाभागांनाच माहीत.

रघुनाथ मोहूर्ले यांना न्याय मिळेल तेव्हा मिळेल त्यासाठी तर शेवटपर्यंत भांडत राहूच पण कोलमडलेल्या शेतकऱ्यांला आधी आर्थीक विवेचनातून बाहेर काढणे आवश्यक असून त्यासाठी शेतकऱ्यांसाठी सतत आवाज उठवणारे शेतकऱ्याना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका घेऊन कार्यरत ओबीसी नेते मंगेशभाऊ पोटवार आणि सामाजिक कार्यकर्ते धनराज रामटेके ह्या शेतकरी पुत्रांनी रघुनाथ मोहूर्ले यांना एक अल्पसा आधार मिळावा म्हनुन रोख दहा हजार रुपये आर्थिक मदत दिली.

यावेळेस लोकमतचे पत्रकार भोजराज गोवर्धन, जानाळा गावच्या सरपंच रजनी भोयर, समाजीक कार्यकर्ते रोहित निकुरे, जानाळा गावच्या उपसरपंच दर्शना किन्नके, ग्रामपंचायत सदस्य रविद्र मरापे, रविशंकर भोयर, मिथुन बोरुले, पुंडलिक ढोले, मिलिंद शेडमाके, दिलीप कस्तुरे, अंकुश कस्तुरे आणि गावकरी मंडळी उपस्थित होते.