अधिकारी,कर्मचा-यांकडून आपदग्रस्तांना मदत

30

मूल:- येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि तहसिल कार्यालयातील अधिकारी-कर्मचा-यांकडूनकोविडने मृत्यू झालेल्या व आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्याकुटुंबीयांना दिवाळीनिर्मीत्य रोख रक्कम व मिठाईवितरित करण्यात आली.तालुक्यातील बोंडाळा बुज येथील मोरेश्वर धामदेव बोरकुटे व उश्राळाचक येथील रूपेश देवराव नरमलवारया दोन शेतक-यांनी आत्महत्या केली होती. तर करवनयेथील जयंत गणपत चैधरी व मूल येथीलप्रफुल भुजंगराव कोरेकार यांचा कोरोनाने मृत्यू झाला. याचैघांच्याही कुटुंबीयांना दिवाळीनिर्मीत्य 7500 रूपये रोखआणि मिठाई तहसीलदारांच्या हस्ते देण्यात आली.
यावेळी तहसीलदार,नायबतहसिलदार,मंडळ अधिकारी,अव्वलकारकून,महसूल सहाय्यक,तलाठी,शिपाई,आदी उपस्थित होते.?कार्यक्रमाचे संचालन राकेश जांभूळकर यांनी केले.