जानाला व आगडी येथील शेतकर्‍यांनी बांधला वनराई बंधारा

40

तालुक्यातील  मूल येथून जवळ असलेल्या जानाला व आगडी येथील शेतकर्‍यांनी वनराई बंधारा दि. 30 ऑक्टोबरला बांधला. यात अनेक शेतकर्‍यांनी भाग घेत बंधारा बांधण्यात सहकार्य केले.

पावसाळा संपून हिवाळ्याला सुरवात झाली आहे. त्यामुळे नदी नाल्याचे पाणी आटून संपण्याचे मार्गावर आहे. तसेच नदीचा प्रवाह कमी होत आहे. त्यामुळे पाणी आडवा जीवन जगवा या योजनेअंतर्गत शेतकर्‍यांनी नदीवर बंधारा बांधण्यास सहकार्य केले. पाणी अडवले तर रब्बी हंगामातील पिकांना मुबलक पाणी मिळेल तसेच पाणीपुरवठा व नळांना मूबलक पाणी मिळेल, या उद्देशाने नदीवर बंधारा बांधण्यात आला.

         बंधारा बांधताना  चिचपल्ली वनपरिक्षेत्रा अंतर्गत उपक्षेत्र -मूल नियतक्षेत्र-जानाला येथील कक्ष क्रमांक 534 मधे “पाणी अडवा पाणी जिरवा ” या संकल्पने चे महत्व गांवकरयाना पटवून देऊन जानाला व आगडी गावातील लोकांच्या सहभागातून ब्रसवुड बंधारा व वनराई बंधारा बांधन्यात आले सदर बंधारा बाधतानासौ.रंजनाताई भोयर सरपंच जानाला, सौ. दर्शना किन्नाके उपसरपंच जानाला,श्री ईश्वर वाढई ग्रा.प.सदस्य, सौ.शालू कुंभरे ग्रा.प.सदस्य,सौ.निता निकोडे ग्रा.प.सदस्य श्री.डी.एन.बोरकर ग्रामसेवक जानाला , आर.जे.गुरनुले वनरक्षक जानाला श्री रविशंकर भोयर,श्री धनराज रामटेके सामाजिक कार्यकर्ता जानाला व गावकरी उपस्थित होते