कोसंबी येथे पहिली शिक्षण परिषद

35

मूल: गटशिक्षणाधिकारी वैभव खांडरे यांच्या मार्गदर्शनात कोसंबी येथेशिक्षण विस्तार अधिकारी जयश्री गुज्जनवार यांच्या अध्यक्षतेखाली मारोडाकेंद्रस्तरीय शिक्षण परिषद जि.प.उच्च प्राथमिक शाळा कोसंबी येथे घेण्यात
आली.यावेळी केंद्रप्रमुख प्रमोद कोरडे,मुरर्लीधर आत्राम,साधनव्यक्ती आनंदगोंगले,सचिन पुल्लावार,सूर्यकांत चटारे,धम्मप्रकाश भेले,कल्पना दुधाणी,मायाझरकर,नीलिमा रापर्तीवार उपस्थित होते.

प्रास्ताविकेतून कोरडे यांनी या उपक्रमाचे महत्व सांगितले.साधन व्यक्तींनीन्यास,शिष्यवृत्ती,नवोदय,शाळाबाहेरची शाळा,मिशन गरूढझेप,याविषयीमार्गदर्शन केले.संचालन मुख्याध्यापक प्रशांत गटलेवार तर आभार अनिलगांगरेडीवार यांनी मानले.कार्यक्रमास रामकृष्ण गिरडकर,वैशाली महाकारकार यांनीपरिश्रम घेतले.कार्यक्रमास केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते.