अकरावीच्या प्रवेशापासून वंचित विद्याथ्र्यांना आ.मुनगंटीवारांकडून अपेक्षा

55

मूल:- शिक्षण विभागाच्या वेळाकाढू धोरणामुळे प्रतिक्षा यादीतील 60 विद्यार्थी अजुनही प्रवेशापासुन वंचित असून शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागाने सहकार्य करावे,अशी मागणी विद्यार्थी नेते प्रज्योत रामटेके यांनी केले आहे. दरम्यान,प्रवेशापासून वंचित असलेल्या विद्याथ्र्याच्या न्यायासाठी माजी मंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांनी प्रयत्न चालविल्याने प्रवेशापासून वंचित विद्याथ्र्यांनी न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे.
स्थानिक नवभारत कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय येथील इयत्ता अकरावीच्या प्रवेश क्षमता 180 विद्याथ्र्यांची आहे.यावर्षी तालुक्याता इयत्ता दहावीचा उत्तमनिकाल लागल्याने इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश घेणा-या विद्याथ्र्यांची संख्याआपसुकच वाढली.त्यामुळे सदर कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्याप्रवेशाकरीता 80 च्या वर विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत. प्रतीक्षा यादीमध्ये असलेल्याविद्याथ्र्यांना प्रवेश मिळावा म्हणून शाळा प्रशासनाचा पाठपुरावा सुरू आहे.परंतुसंबंधित विभागाकडून अद्यापही परवानगीन मिळाल्याने प्रतीक्षा यादीत असलेल्या विद्याथ्र्यांनाप्रवेश दिलेला नाही. परिणामी प्रतीक्षा यादीत असलेल्याविद्याथ्र्यांनी प्रवेशासाठी तगादा लावाला असून शैक्षणिक नुकसान होवू न देण्याची शाळा प्रशासना
सोबतच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला विनंती केली आहे.पंरतु शिक्षण विभागाकडून अद्यापही प्रतिसादन मिळाल्याने शिक्षणापासून वंचित विद्याथ्र्यांनीस्थानिक विद्यार्थी नेते प्रज्येात रामटेके यांचे माध्यमातूनमाजी मंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेवूनन्याय मिळवून देण्याची विनंती केली.विद्याथ्र्यांची मागणी आणि वास्तविक परिस्थिती लक्षात घेवून आ.सुधीर मुनगंटीवारयांनीही विद्याथ्र्यांनी न्याय देण्याचे आश्वासन दिले.मुनगंटीवार यांनी जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागासोबतच शिक्षण उपसंचालक कार्यालयात केलेल्या पत्रव्यवहारामुळे येत्या पंधरा दिवसात प्रतीक्षा यादी मधील विद्याथ्र्यांना इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश मिळेल,असा विश्वास प्रज्येात रामटेके यांनी व्यक्त केला असून विद्याथ्र्यांना संयम पाळावा असे आवाहन केले आहे.