शहीद दिनानिमित्त एक दिवसीय समाज प्रबोधन

78

मूल:- जल ,जंगल ,जमीन ही येथील स्थानिक लोकांची असून त्यावर येथील रहिवासी बहुजनांचा अधिकार असला पाहिजे याकरिता इंग्रज सत्तेविरुद्ध येवढ्या दुर्गम भागात आवाज उठविणाऱ्या महान क्रांतिवीर ,तत्कालीन इंग्रज अधिकाऱ्यांना जेरीस आणून सलो की पळो करून सोडणाऱ्या ,आजच्या युवापिढीस प्रेरणादायी असणाऱ्या वीर बाबुराव पुल्लेसुर शेडमाके यांचा इतिहास काराना विसर पडला ही समस्त आदिवासी समाजासाठी दुर्भग्याची गोष्ट असल्याचे मत बिरसा ब्रिगेड चे राष्ट्रीय अध्यक्ष इंजी.सतीश पेंदाम यांनी व्यक्त केले.ते मूल येथील कन्नमवार सभागृहात प्रब्रम्हाणद मडावी आणि सहकाऱ्यांनी केलेल्या आयोजित क्रांतिवीर बाबुराव पल्लेसुर शेडमाके यांच्या शहीद दिनानिमित्त एक दिवसीय समाज प्रबोधन शिबिरात बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, या देशातील आदिवासी क्रांतिवीर, महापुरुष यांचा कुठेच अभ्यासक्रमात इतिहास अभ्यासक्रमात शिकविल्या जात नाही ,त्यामुळे देशासाठी प्राणाची आहुती देणारे विर पुरुष पडद्या खाली दाबल्या गेले आहेत. त्यांचा इतिहास हा अशा सामाजिक कार्यक्रमातून जगापुढे मांडता येईल. त्यासाठी समाजातील युवक वाचक निर्माण होणे गरजेचे आहे .सदर कार्यक्रम पुरस्कृत मुख्याध्यापक मुरलीधर अत्राम यांचे अध्यक्षतेखाली तर मुख्याध्यापक गिरिधर कन्नाके, विस्तार अधिकारी येरमे यांचे प्रमुख उपस्थितीत घेन्यात आले.कर्यकमाचे प्रास्ताविक प्रब्रम्हाणांद मडावी यांनी,सूत्र संचालन लक्ष्मण सोयाम यांनी केले .कार्यक्रमाला मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव उपस्थित होते .