मुल तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी अखील गांगरेडीवार

67

मूल:- तालुक्यातील सरपंच व उपसरपंच यांच्या सभेत मूल तालुका सरपंच संघटनेची पुर्नरचना करण्यात आली. स्थानिक पंचायत समिती सभागृहात पार पडलेल्या संघटनेच्या सभेतझालेल्या चर्चेनुसार भेजगाव येथील सरपंच अखील गंागरेडीवार यांची संघटनेच्या अध्यक्ष पदी तर नांदगाव येथील सरपंच अॅड.हिमानी वाकुडकर यांची सचिव पदी एकमताने निवड करण्यात आली.केसंबी येथील सरपंच रवींद्र कामडी यांची उपाध्यक्ष,राजोलीयेथील सरपंच जितेंन्द्र लोणारे यांची कोषाध्यक्ष आणिकेळझर यांची सहसचिव आणि राहुल मुरकुटे ताडाळा यांचीप्रसिध्दी प्रमुख पदावर एकमताने निवड करण्यात आली.कार्यकारिनी सदस्य म्हणून करूणा उराडे बेंबाळ,योगीता गेडामदाबगाव,यशवंत खोब्रागडे नवेगांव भूजला,उपसरपंचदुर्वास कडस्कर चिखली,उपसरपंच सूरज चलाखचिचाळा,प्रदीप वाढई विरई,हरीभाऊ येनगंटीवार बोरचांदली,वासुदेव वाघ गांगलवाडी,पलिंद्र सातपुतेउथळपेठ,उपसरपंच अतुल बुरांडे दाबगाव,जालींदरबांगरे बोंडाळा,यांची निवड करण्यात आली.आदर्श ग्राम राजगड येथील उपसरपंच चंदूपाटील मारकवार हे संघटनेचे सल्लागारम्हणून जबाबदारी संभाळतील.संघटनेचेनवनियुक्त अध्यक्ष अखील गांगरेडीवार हेकृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालकअसून सामाजिक,राजकीय क्षेत्रात नावलौकीकप्राप्त आहेत.त्यामुळे भविष्यात सरपंच व उपसरपंचयांच्या समस्या सोडविण्यास गांगरेडीवार यांचासक्रिय सहभाग राहणार असल्याचा विश्वासउपस्थित सरपंच व उपसरपंच यांनी व्यक्त केला.