कवयित्री प्रा.रत्नमाला प्रभाकर भोयर नगराध्यक्ष यांच्या शब्दरिंगण या दुसऱ्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मूल येथे संपन्न

72

मूल (प्रतिनिधी )-
झाडीबोली साहित्य मंडळ (ग्रामीण) चंद्रपूरच्या वतीने आयोजित कवयित्री प्रा.रत्नमाला प्रभाकर भोयर नगराध्यक्ष यांच्या शब्दरिंगण या दुसऱ्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मूल येथे संपन्न झाले.
मा.सा.कन्नमवार सभागृहात आयोजित कार्यक्रमाचे उदघाटन ज्येष्ठ नागरीक नामदेवराव कोरडे यांचे हस्ते झाले. अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे मराठी अभ्यास मंडळाचे कार्याध्यक्ष प्रा.डाॕ.सुदर्शन दिवसे होते . भाष्यकार म्हणून झाडीबोलीचे केंद्रीय सदस्य ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , झाडीबोलीचे चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष अरूण झगडकर , गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य सुनील शेरकी , प्रभाकर भोयर, सौ. मंजुळाबाई कोरडे आदींची प्रमुख उपस्थिती होती . प्रास्ताविक कवयित्री प्रा.रत्नमाला भोयर यांनी केले.कार्यक्रमाध्यक्ष डाॕ. दिवसे म्हणाले, लेखन करताना मनात न्युनगंड न बाळगता , प्रमाणभाषेच्या प्रभावाने दबुन न जाता आपल्या भागातील अस्सल झाडीबोलीत लेखन करावे. बोलीचे सौंदर्य जपण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे.बोली जीवंत राहण्यासाठी तसे साहित्य निर्माण होणे गरजेचे आहे.लेखकांची ही सामाजिक जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. भाष्यकार ग्रामगीताचार्य बोढेकर म्हणाले, शब्दरिंगण ह्या काव्यसंग्रहातून कवयित्री सौ. भोयर यांनी निसर्ग कवितांसोबतच काव्यात्म पध्दतीने मुल्यव्युहांना इजा न करता मनाची गुढे उकलून दाखविण्याचा उत्तम प्रयत्न केलेला आहे. अरूण झगडकर यांनी झाडीपट्टी संस्कृती आणि लेखनांचे उपक्रम यावर प्रकाश टाकला.
याप्रसंगी झाडीबोली साहित्य मंडळाच्या वतीने अरूण झगडकर,सुनिल पोटे,लक्ष्मण खोब्रागडे,भारती तितरे आणि प्रीती जगझाप यांना रत्नप्रभा साहित्य काव्यलेखन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
दुसऱ्या सत्रात निमंत्रित कवीचे काव्यवाचन कवयित्री सविता झाडे-पिसे यांच्या अध्यक्षतेखाली आणि कवयित्री प्रभाताई चौथाले व सुनीता बुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले .यात संतोष मेश्राम,परमानंद जेंगठे,मनिषा पेंदोर, संगीता बढे , सविता कोट्टी, स्मिता बांडगे , लीना भुसारी ,नेतराम इंगळकर , नागेंद्र नेवारे , मंगला गोंगले , अर्जुमन शेख , अरुण घोरपडे , किरण चौधरी , उपेंद्र रोहणकर , रामकृष्ण चनकापुरे आदींनी आपल्या काव्यरचनांचे सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी लक्ष्मण खोब्रागडे आणि कवायित्री प्रीती जगझाप यांनी केले तर आभार कवयित्री संजिवनी वाघरे यांनी मानले.