MPSC Exam: राज्य सेवा परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

67

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात प्रसिद्ध केली होती. राज्य सेवा परीक्षा 2021 अंतर्गत 390 पदांसाठी प्रक्रिया सुरु आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं अर्ज दाखल करण्यासाठी 25 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती.एमपीएससीकडून अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. उमेदवार आता राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करु शकतात. 390 पदांसाठी 2 जानेवारी 2022 ला एमपीएससीकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित केली जाईल. अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ मिळाल्यानं विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

एमपीएससीकडून नवं परिपत्रक

आज एमपीएससीनं नवीन परिपत्रक काढत अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ दिल्याचं जाहीर केलं आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 31 ऑक्टोबर 2021 रोजी 23:59 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. एकूण 20 संवर्गातील 390 पदांची जाहिरात आली आहे. विद्यार्थ्यांना विहित मुदतीत अर्ज दाखल करण्याचं आवाहन करण्यात आलंय.

जाहिरात क्र.: 106/2021

परीक्षेचे नाव: महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021

Total: 290  390 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 उप जिल्हाधिकारी, गट-अ 12
2 पोलीस उप अधिक्षक/सहायक पोलीस आयुक्त, गट-अ 16
3 सहायक राज्य कर आयुक्त, गट-अ 16
4 गट विकास अधिकारी व तस्यम पदे, गट-अ 15
5 सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ 15
6 उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ 04
7 सहायक कामगार आयुक्त, गट-अ  22
8 उपशिक्षणाधिकारी व तस्यम पदे, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब 25
9 कक्ष अधिकारी, गट-ब 39
10 सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब 04
11 सहायक गटविकास अधिकारी, व तस्यम पदे, गट-ब 17
12 सहायक निबंधक सहकारी संस्था, गट-ब 18
13 उप अधीक्षक, भूमि अभिलेख, गट-ब 15
14 उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,  गट-ब 01
15 सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क,  गट-ब 01
16 कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी,  गट-ब 16
17 सरकारी कामगार अधिकारी,  गट-ब 54
18 उपनिबंधक, सहकारी संस्था, गट-अ  10
19 मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, गट-अ 15
20 मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, गट-ब 75
Total 390

शैक्षणिक पात्रता:

  1. सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ: 55% गुणांसह B.Com किंवा CA/ICWA किंवा MBA.
  2. उद्योग उप संचालक (तांत्रिक), गट-अ: अभियांत्रिकी पदवी (स्थापत्य अभियांत्रिकी वगळून) किंवा तंत्रज्ञानमधील पदवी किंवा विज्ञान शाखेतील पदवी.
  3. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब: भौतिकशास्त्र व गणित विषयासह विज्ञान अथवा अभियांत्रिकी शाखेतील पदवी.
  4. उर्वरित पदे: पदवीधर किंवा समतुल्य.

वयाची अट:  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

  1. उप जिल्हाधिकारी, गट-अ: 01 एप्रिल 2022 रोजी 19 ते 38 वर्षे
  2. उर्वरित इतर पदे: 01 फेब्रुवारी 2022 रोजी 19 ते 38 वर्षे

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र.

Fee: अमागास प्रवर्ग: ₹544/- [मागासवर्गीय: ₹344/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑक्टोबर 2021  31 ऑक्टोबर 2021 (11:59 PM)

  1. पूर्व परीक्षा: 02 जानेवारी 2022
  2. मुख्य परीक्षा: 07, 08 & 09 मे 2022

परीक्षा केंद्र: महाराष्ट्रातील 37 केंद्र.

अधिकृत वेबसाईट: पाहा

शुद्धीपत्रक: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online