मुल तालुक्यात नव्याने 3 स्वस्त धान्य दुकानांची पडणार भर

35

मूल तहसिल कार्यालयात 30 आॅक्टोबर पर्यंत अर्ज करावे,असे आवाहन तहसिलदार डाॅ.रविंन्द्र होळी यांनी केले आहे.
मूल:- स्वस्त धान्य दुकानांतून गरीब तसेच गरजुंना धान्य वितरण केले जाते. मात्र वाढतीलोकसंख्या आणि सध्या अस्तित्वात असलेल्या दुकानांची संख्या बघता या दुकानातून धान्यवितरण करताना दुकानदारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांनासुलभरित्या धान्य मिळावे तसेच त्यांना त्रास होऊ नये,यासाठी तालुक्यात आता 3न्वीन स्वस्त धान्य दुकानांना मंजुरी मिळणार असून नागरिकांना सुविधा मिळणार आहे.

दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे.त्या तुलनेत स्वस्त धान्य दुकानांची संख्या कमी आहे.त्यातच मागील काही वर्षामध्ये नवीन दुकानांना स्थगितीहेाती.ती आता उठविण्यात आल्याने नवीन दुकानेमिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे मुल तालुकानिहाय गाव तसेच लोकसंख्या बघता पुरवठा विभागाने तालुक्यात 3 नवीन दुकाने
अं.क्र तालुक्याचे नाव रास्तभाव दुकान मंजुर करावयाचे आहे त्या गावाचे नाव
1 मुल चकघोसरी
2 मुल कोसंबी
3 मुल गेावर्धन
येथे देण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे दुकान मिळेल या आशेवर असलेल्या आधार मिळणार आहे.मात्र वैयक्तिक दुकानेन देता स्वयंसहायता बचत गटांनाच अधिकप्राधान्य देण्यात येणार आहे.अधिकाधिक गटांनी मूल तहसिल कार्यालयात 30 आॅक्टोबर पर्यंत अर्ज करावे,असे आवाहन तहसिलदार डाॅ.रविंन्द्र होळी यांनी केले आहे.