त्या’ तिहेरी मुख्य रस्त्यावर वाहतूक खोळंबली मूलच्या उमा नदीवरील

27

चंद्रपूर -गडचिरोली -नागपूर कडे जाणार्‍या मुख्य रस्तावर मूलची उमा नदी ओलांडून जावे लागते. परंतु मागील तीन वर्षांपासून गडचिरोली मुख्य हायवेचे सिमेंट क्राँकीटचे काम केले जात असून नदी जवळ तिहेरी रस्त्याचे काम सुरू आहे. मरेगाव मार्ग नागपूरकडे व आकापूर मार्ग गडचिरोलीकडे आणि मूलमार्ग चंद्रपूरकडे वाहतुकीचे मुख्य रस्ते आहेत.
मूलच्या उमा नदीवरील पुलाच्यावर मध्ये गॅप पडली आहे तसेच पुलावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असल्याने मोठया पुलावरून काम होईपयर्ंत वाहतूक बंद ठेवून लहान पुलावरून वाहतूक सुरू ठेवली आहे. परंतु खालच्या रस्त्यावर कंत्राटदारांनी चिकट माती टाकून ठेवल्याने रात्री आलेल्या पावासामुळे खालच्या रस्त्यावर ट्रक फसल्याने १७ ऑक्टोबरला सकाळी ७ वाजेपासून जाणारी येणारी वाहतूक खेाळंबंली त्यामुळे नदीपासून ते आकापूर पयर्ंत व मरेगाव पयर्ंत मूलकडे येणार्‍या रस्त्याची जुन्या स्मशानभूमीकडे जाणार्‍या वळणापयर्ंत अशा तिन्ही रस्त्यावरील १७0 वाहने चार ते पाच तास वाहतूक ठप्प झाली होती.
महत्वाच्या कामाने जाणार्‍या येणार्‍या वाहतूकदार यांना ताटकळत अडून राहण्याची पाळी आली. नदीपुलावरील पडलेली गॅप व खड्डे आहे. अतिशय महत्त्वाचे कामासाठी जात असलेल्या नागरिकांना अडून राहावे लागले याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच गडचिरोली हायवे रोडवर चिमढा नदीवरील पुलाचेही काम अजून अपूर्ण अवस्थेत असून नदीच्याएलीकडे व पलीकडे रस्याचे काम पूर्ण झालेले नाही व
कंत्राटदार यांनी रस्त्यावर पिवळी चिकट माती टाकून ठेवल्याने चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. जाताना येताना दुचाकी वाहनधारक चिखलामुळे घसरून पडल्याने नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. चिमढा नदीवरील जुन्या पुलावर पाच फुटाची मोठे खड्डे पडले असून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. अशी अवस्था असताना संबंधित कंत्राटदार व हायवे कामावर नियंत्रण ठेवणारे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.कंत्राटदार यांच्या चुकीमुळे एखाद्या मोठा अपघात झाला तर तो मी नव्हेच अशी भूमिका घेऊन कंत्राटदार व संबंधित विभाग यातून पळवाट शोधू शकतो अशी अवस्था प्रत्यक्षात दिसून येत आहे. या यंत्रणाकडे देखरेख करण्याचे काम आहे त्यांनी त्वरित लक्ष घालावे आणि जिल्हाधिकारी यांनी सुध्दा या महत्त्वाच्या समस्याकडे तात्काळ पाहणी करून संबंधित विभागाला व कंत्राटदाराला त्वरित काम करण्याच्या सूचना द्याव्या, अशी मागणी शेकडो वाहतूकधारकांनी केली आहे.