तालुका कृषी अधिकारी कार्यालय मूलच्या वतीने शेतक-यांना विशेष मार्गदर्शन

70

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग अन्नयन कार्यशाळा
मूल:- तालुका कृषी अधिकारी कार्यालय मूलच्या वतीने शेतक-यांना विशेष मार्गदर्शन होण्याच्या दुष्टीने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग अन्नयन कार्यशाळेचे आयोजन प्रशासकीय भवन मूल येथे करण्यात आले.या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी शेतीनिष्ठ शेतकरी प्रभाकर सोनुले होते,

तर प्रमूखमार्गदर्शक म्हणून मुलचे तहसीलदार डाॅ.रवीद्र होळी,कृषी संशोधन केंद्र सिंदेवाहीच्या लोखंडे,प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग अन्नयनच्या मार्गदर्शिका अश्विनी ढेगणे, बॅंक आॅफ इंडियाचे व्यवस्थापक मेश्राम,तालुका कृषी अधिकारी बी.एम.गायकवाड,मंडळ कृषी अधिकारी तिजारे,शेतकरी बंधू आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी शेतक-यांना सखोल मार्गदर्शन करून विविध प्रश्नांवर साध बाधक चर्चा करण्यात आली.यावेळी शेतकरी उत्पादन कंपनी,शेतकरी बचत गट आदींनी निर्माण झालेल्या प्रश्नावर चर्चा घडवून आणली. त्याला उपस्थित मान्यवरांनी चर्चात्मक उत्तरे दिली.

स्ंचालन कृषी सहायक मंत्रीवर,प्रास्ताविक गायकवाड,तर उपस्थितांचे आभार कृषी सहायक चट्टे यांनी मानले.