सोयाबीन काढताना शेतमजुराचा दुर्दैवी मृत्यू

29

 राजुरा तालुका प्रतिनिधी :-

           तालुक्यातील गोयेगाव शेतशिवारात थ्रेशरच्या साहाय्याने सोयाबीन काढत असतांना थ्रेशरमध्ये दबून शेतमजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुःखद घटना आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास गोयेगाव शेतशिवारात घडली. मृतक शेतमजुरांचे नांव रामकृष्ण धोटे वय ४० रा. माथरा असे असून मृतक रामकृष्ण धोटे गावातीलच एका थ्रेशर मालकासोबत गोयेगावला सोयाबीन काढण्याकरिता मधुकर ताजने यांच्या शेतात गेला होता. सोयाबीन काढत असतांना तो थ्रेशरमध्ये दबला गेला. त्याचा चेहरा व छातीपर्यंत भाग थ्रेशरमध्ये दबल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतकाचा मागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पोलिसांच्या मार्गदशनात बातमी लिहीपर्यंत मृतकाला थ्रेशर मधून काढण्याचा प्रयत्न सुरु होते.