पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजना

39

केंद्र शासनाने सन २0२0-२१ या वषार्पासुन पशुसंवर्धन पायाभुत सुविधा विकास निधी या नवीन योजनेस मंजुरी प्रदान केली आहे. सन २0२१-२२ या वर्षात या योजनेकरीता १५ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
या योजनेअंतर्गत दुध प्रक्रिया (आईसक्रीम, चीजनिर्मिती, दुधपाश्‍चराईजेशन, दुध पावडर इ.), मांस निर्मिती व प्रक्रिया, पशुखाद्य, टीएमआर ब्लॉक्स, बायपास प्रोटिन, खनिज मिर्शण, मुरघास निर्मिती, पशुपक्षी खाद्य विेषण प्रयोगशाळा या उदयोग व्यवसायांना ९0 टक्के कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार असून व्याज दरामध्ये ३ टक्के सुट देण्यात येणार आहे. योजनेच्या सर्व मार्गदर्शक सुचना, योजनेसंदर्भात वारंवार उपस्थित होणारे प्रश्नोत्तरे, योजनेसाठी ऑनलाईन पदधतीने सादर करावयाचा अजार्चा नमुना आणि आवश्यक कागदपत्रांची यादी केंद्र शासनाच्या पशुपालन व डेअरी विभागाच्या ँ३३स्र://ँिं.्रिा्रू.ॅ५.्रल्ल या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच पशुसंवर्धन विभागाच्या ँ३३स्र://ंँ.िेंँं१ं२ँ३१ं.ॅ५.्रल्ल या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करुन देण्यात आली असून योजनेच्या मार्गदर्शक सुचना प्रसिदध करण्यात आल्या आहेत. सदर योजनेच्या लाभासाठी संकेतस्थळावरील पोर्टलव्दारे ऑनलाईन प्रस्ताव सादर करावयाचा आहे.
केंद्र शासनाने वर नमुद उदयोग व्यवसायासोबतच लिंग विनिश्‍चित वीर्यमात्रा निर्मिती, बाह्यफलन केंद्र (आयव्हीएफ), पशुधनाच्या शुद्ध वंशावळीच्या प्रजातींचे संवर्धन याबाबींचा समावेश केला आहे. सदर योजनेचा व्यक्तिगत व्यावसायिक, शेतकरी उत्पादक संस्था, खाजगी संस्था, कलम ८ अंतर्गत स्थापन झालेल्या कंपनी यांना लाभ देता येईल.