सर्पदशांने 13 वर्षीय युवकाचा मृत्यू

35

सर्पदशांने 13 वर्षीय युवकाचा मृत्यू
मूल:- तालुक्यातील येरगाव येथील 13 वर्षीय युवकाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना काल मंगळवारी 12 आॅक्टोबर रोजी घडली .ध्रृव संजय गडपल्लीवार 13 असे सर्पदंशाने मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
धृव यास सर्पदंश झाला असता उपचाराकरिता चंद्रपूर जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले होत.परंतू रूग्णालयात वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान यंग चांदा बिग्रेड विद्यार्थी आघाडीच्या टिमने प्रत्यक्षात जाऊ रूग्णालयात भेट दिली.व झालेल्या संतापजनक प्रकरणाची सखोल चाौकशी तसेच शासकीय रूग्णालयातील प्रत्येक कामचुकार कर्मचा-यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय दूर्गे यांनी केली.