चार महिन्यांपासून निराधार वृध्दांकडे शासनाचे दुर्लक्ष,बॅंकांचे उंबरठे झिजवून वृध्द निराधार त्रस्त

67

चार महिन्यांपासून निराधार वृध्दांकडे शासनाचे दुर्लक्ष,बॅंकांचे उंबरठे झिजवून वृध्द निराधार त्रस्त
मूल:- निराधार योजनेच पैसे न आल्याने ज्येष्ठ नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मुल तालुक्यातील वृध्द तसेच निराधार अपंग जेष्ठ नागरिकांचे मानधन गत चार महिन्यांपासून त्यांच्या खात्यात जमा न झाल्याने हजाराहून अधिक नागरिकावर अक्षरश: उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे मुलाबाळांनी सोडून दिलेल्या किंवा उत्पनाचे ठोस साधन नसलेल्या निराधारांना किमान शासनाने तरी आधार देण्याची गरज आहे.

तळागाळातील नागरिकांचा विचार करून वेगवेगळया योजना शासनस्तरावर होत असल्या तरी प्रत्यक्षात मात्र अनेक लाभार्थी प्रत्यक्ष लाभापासून वंचित आहेत.मुल तालुक्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या संजय गांधी,निराधार इंदिरा गांधी निराधार,वृध्दापकाळ,श्रावणबाळ,राष्ट्रीय कुटुंब लाभयोजनेअंतर्गतवृध्द,दिव्यांग

अविवाहित,महिला,विधवा,घटस्फोटित,परित्यक्त्या,निराधार अशा दारिद्रय रेषेखालील
हजाराहून अधिक लाभाथ्र्याचे अनुदान गत चार महिन्यांपासून त्यांच्या बॅंक खात्यावर जमा झालेले नाही.या योजनांचे तालुक्यात लाभार्थी असून प्रती लाभाथ्र्यांना मासिक एक हजार रूपयांप्रमाणे अनुदान तहसील कार्यालयाच्या संजय गांधी विभागामार्फत दिले जाते.दोन वर्षापासून कोरोनाचे संकट उभे ठाकले असल्याने अनेक लाभार्थी कोरोना संक्रमणात निराधार झाले आहेत. त्यामध्ये चार महिन्यांपासून संजय गांधी,श्रावणबाळ,इंदिरा गांधी योजनेच्या लाभाथ्र्याचे पैसे मिळाले नाहीत. शासनाकडून निधी न आल्याने वितरण करता आले नाही,असे सांगण्यात येत आहे.सण उत्सवाच्या काळात लाभाथ्र्यांना पदरी निराशाच आली.काही लाभार्थी शासनाकडून मिळणा-या या मानधनावरच अवलंबून असल्याने त्यंाची दमछाक होत आहे.शासनाकडून आधीच तुटपंुजे अनुदान अन तेही महिनोमहिने मिळत नाही त्यामुळे या लाभाथ्र्यांनी काय करावे असा प्रश्न निर्माण आहे.