विदयार्थ्यांनी कायद्याचे ज्ञान आत्मसात करावे

70

विदयार्थ्यांनी कायद्याचे ज्ञान आत्मसात करावे

  
मूल :-                                                    
उच्च व सर्वोच्छ न्यायालय यांचे निर्देशानुसार विधी सेवा समिती ,अधिव्याख्याता संघ, दिवानी व फौजदारी न्यायालय मूल ,च्या वतीने स्वातंत्र्याच्या  ७५ व्या वर्धापन दिनानिमीत्य व बालीका दिनाचे औचित्य साधुन नवभारत कन्या विद्यालय मूल, येथे बेटी बचाव बेटी पढाव या कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 11ऑक्टोबर ला  करण्यात आले .   
                                 
सदर कार्यक्रम मूल तालूका दिवानी व फौजदारी न्यायालय मूलच्या वतिने  आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला नवभारत कन्या विद्यालय मूल येथुन गांधी चौक ते बस स्थानक अशी रॅली काढण्यात आली, यात ‘मुला  पेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी ‘  ‘ बेटी बचाव, बेटी पढाव ‘अशा घोषणा देत हातात जनजागृतीचे फलक घेऊन रॅली शाळेत परत आल्यानंतर त्याचे रूपांतर सभेत करण्यात आले.                                                           
सभा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका  एम.एस. सुंकरवार ,यांचे अध्यक्षतेखाली तर न्यायाधीश ए. व्ही. ढोरे , अँड. स्वप्नील भडके,ऍड.जांगडे, शिक्षण विस्तार अधिकारी गुज्जनवार, पर्यवेक्षक एस. एस. पुराम , यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला . अँड भडके यानी मुलींच्या कायदेविषयक अधिकार याबद्दल मार्गदर्शन केले . मुलीवर होत असलेले  लैगिक . अत्याचार . आणि अशिक्षीतता  यावर गुञ्जनवार यांनी मार्गदर्शन केले .
      प्रत्येक घडलेले प्रसंग निर्भीडपने घरच्यापुढे पोलीस प्रशासना पुढे सांगण्याचे धाडस केले पाहिजे . आपल्यावर होत असलेले  अन्याय अत्याचार सहन न करता त्याचा प्रतिकार करने गरजेचे असल्याचे मत न्यायाधीशि ढोरे यानी व्यक्त केले .कार्यक्रमाचे प्रास्तावीक अँड. प्रणव वैरागडे यानी केले , संचालन छात्रपती बारसागडे यानी तर उपस्थितांचे आभार दिनेश जिड्डीवार यांनी मानले. कार्यक्रमास अँड. दाऊद शेख, अँड आझादब्रम्ह नागोशे, अँड अनंत बल्लेवार, अँड मुद्दमवार ,रत्नपारखी, सर्व शिक्षक, शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्यासंख्येने उपस्थित होते .