कु.सृष्टी जगदिश हांडेकर हिची नवोदय विद्यालय तळोधी येथे वर्ग ५ वि करीता निवड

35

मूल:- येथिल सेन्ट अँन्स पब्लीक स्कुल मूल चि कु . सृष्टी जगदिश हांडेकर हिची नवोदय विद्यालय तळोधी येथे वर्ग ५ वि करीता निवड करण्यात आली . सृष्टी आपल्या यशा बद्दल बोलताना तीची शिक्षीका वैशाली देशमुख आणि प्रिसींपल सॉलेट सबेस्टीयन, विषेश म्हणजे या यशामागे तीचे आजोबा माजी प्रचार्य ते. क. कापगते आणि आई वडील यांचा मोठा वाटाअसल्याचे तीने सांगितले. सदर विद्यालयात जिल्ह्यातील निवडक विद्यार्थी प्रवेशित असल्यामुळे पुढिल शिक्षण शिस्तबद्ध पद्धतीने व बिना फी देता , जिल्ह्यातील विद्यार्थ्यासोबत स्पर्धा करुण शिकता येईल असे तिने सांगितले तिच्या यशाबद्दल सॅन्ट अँन्स येथिल प्राचार्या सॉलेट सबेस्टीयन सर्व शिक्षक शिक्षीका . तालुक्यात सर्वत्र तीचे कौतुक केल्या जात आहे.