जिल्हा पोलिस दलातर्फे रोजगार मेळाव्याचे आयोजन खासगी सुरक्षा रक्षकांचे रिक्त ३00 जागांकरिता आयोजन

47

चंद्रपूर
जिल्हा पोलिस दल व एसआईएस इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर जिल्हयातील पुरुष उमेदवारांची खासगी सुरक्षा रक्षकाचे रिक्त असलेल्या ३00 जागांकरिता १५/१0/२0२१ रोजी पो.स्टे. गडचांदूर, १६ ऑक्टोबर रोजी पो.स्टे. वरोरा, १७ ऑक्टोबर रोजी पो.स्टे. चिमूर, १८ ऑक्टोबर रोजी पो.स्टे. ब्रम्हपुरी, १९ ऑक्टोबर रोजी पो.स्टे. मूल, २0/१0/२0२१ रोजीचे पो.स्टे. राजुरा वरील सर्व संबंधित पोलिस स्टेशनचे आवारात व २१ व २२/१0/२0२१ रोजी पोलिस मंगल कार्यालय तुकूम चंद्रपूरच्या आवारात सकाळी १0 ते सायं. ४ वा. पयर्ंत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
एस.आई.एस. इंडिया लिमिटेड ही खासगी सुरक्षा रक्षक पुरविणारी नामांकीत कंपनी असुन या कंपनीतर्फे महाराष्ट्र, छत्तीसगड व हैद्राबाद आंध्रप्रदेश येथील सरकारी क्षेत्र तसेच सर्व बँक, एटीएम, हॉटेल, हॉस्पिटल, प्लांट, माईन्स, एअर पोर्ट, बंदरगाह, शिक्षण संस्थान, पुरातत्व विभाग इत्यादी ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात येते.
एस. आई. एस. इंडिया लिमिटेड या कंपनीतर्फे नियुक्ती झालेल्या उमेदवारांना प्रती महिना १२ हजार रु. ते १८ हजार रु. पयर्ंत वेतन, पीएफ, अँज्युईटी, बोनस, राहण्याची व्यवस्था व उमेदवारांचे 0२ मुलांचे द इंडियन पब्लिक स्कूल देहरादून येथे शिक्षण या सुविधा देण्यात येईल. खासगी सुरक्षा रक्षक या पदाकरिता पात्र उमेदवार कमीत कमी दहावी उत्तीर्ण असावा, वयोर्मयादा २१ ते ३७ वर्षे, उंची १६७.५ से.मी. वजन कमीतकमी ५६ किलो असावे, रोजगार मेळाव्यात येताना उमेदवारांनी त्यांच्यासोबत शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो आणि मूळ कागदपत्रांसह उपस्थित रहावे. रोजगार मेळाव्याचे ठिकाणी कंपनीच्या नियमानुसार उमेदवारांचे रजिस्ट्रेशन करतांना उमेदवारांकडून ३५0 रु. एवढी रजिस्ट्रेशन फी आकारण्यात येईल. चंद्रपूर जिल्हा पोलिस दलातर्फे बेरोजगार तरुणांना आवाहन करण्यात येत आहे की, जास्तीत जास्त बेरोजगार तरुणांनी रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे.