IBPS Recruitment 2021: सरकारी बँकांमध्ये तब्बल ५८५८ रिक्त जागांवर नोकरीची संधी, लगेच करा अप्लाय

45

सरकारी बँकांमध्ये लिपिक पदावर नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. कारण इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शनने (IBPS) देशभरातील राष्ट्रीय बँकांमध्ये एकूण ५८५८ रिक्त लिपिक पदासाठीची भरती प्रक्रिया पुन्हा सुरु केी आहे. या भरती प्रक्रियेद्वारे देशभरातील बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि यूको बँक मध्ये एकूण ५८५८ पदे भरली जाणार आहे.

यापूर्वी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शनने ११ जुलै २०२१ रोजी या रिक्त पदाच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली होती. ज्यासाठी उमेदवार १ ऑगस्ट २०२१ पर्यंत अर्ज सादर करु शकत होते. मात्र आयबीपीएसने या पदांसाठी पुन्हा एकदा अर्ज प्रक्रिया सुरु करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे उमेदवार आता २७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करु शकतात.

आयबीपीएसने अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरु करण्यासंदर्भात जारी केलेल्या नोटीफिकेशननुसार, उमेदवार ७ ऑक्टोबरपासून या पदांसाठी अर्ज करु शकतात. ही अर्ज प्रक्रियेची शेवटची तारीख २७ ऑक्टोबरपर्यंत आहे. याशिवाय ८५० रु. हे परीक्षा शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख २७ ऑक्टोबरपर्यंत आहे. यामुळे उच्छुक उमेदवार ibpsonline.ibps.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज दाखल करु शकतात. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २० वर्षावरील असावे परंतु २८ वर्षांपेक्षा अधिक नसावे.

जाहिरात क्र.: CRP Clerks-XI

Total: 5830+जागा 

पदाचे नाव: लिपिक 

शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी.  (ii) संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.

वयाची अट: 01 जुलै 2021 रोजी 20 ते 28 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: General/OBC: ₹850/-   [SC/ST/PWD/ExSM: 175/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 ऑगस्ट 2021   27 ऑक्टोबर 2021

परीक्षा:   

  1. पूर्व परीक्षा: 28,29 ऑगस्ट & 04 सप्टेंबर 2021   डिसेंबर 2021
  2. मुख्य परीक्षा: 31 ऑक्टोबर 2021    जानेवारी/फेब्रुवारी 2022
  3. अधिकृत वेबसाईट: पाहा

    शुद्धीपत्रक: पाहा

    जाहिरात (Notification): पाहा

    Online अर्ज: Apply Online [Starting: 07 ऑक्टोबर 2021]