NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत नवभारत कन्या शाळेचे घवघवित यश !!!

33

मूल:-  एप्रिल 2021 मध्ये झालेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्याथ्र्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेमध्ये शाळेचे पाच विद्यार्थीनी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहेत त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.माध्यमिक शिक्षण क्षेत्रात अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणा-या एनएमएमएस  शिष्यवृत्ती परिक्षेत स्थानिक नवभारत कन्याविद्यालयाच्या विद्यार्थिर्नीनी घवघवित यश संपादकेले आहे.वर्ग 8वीच्या विद्याथ्र्यांकरिता ही परिक्षा असते.या परिक्षेत पात्र विद्याथ्र्यांन प्रतिवर्ष 12 हजारप्रमाणे 12 वी पर्यंत 48 हजार रूपये शासन
स्तरावरून शिक्षणाकरिता दिले जातात.नवभारत कन्या विद्यालयात मूल हे तालुक्यातीलएकमेव कन्या विद्यालय आहे.

विद्यालयाच्या   सलोणी गुलमवार,  वैष्णवी गेडाम,   प्राची पंधरे,   संबोधी लाकडे आणि गौरी बुरांडे

या विद्यार्थिनीनी या परिक्षेत   पात्र ठरून विद्यालयाचे नाव उंचावल्याचे विद्यालयाच्या मुख्याध्यापिकाशुभंागिनी वैरागडे यांनी सांगितले.या परिक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थीनींचे संस्थेचे अध्यक्षअॅड.बाबासाहेब वासाडे,सचिव अनिल वैरागडे,पर्यवेक्षिका मंगला सुंकरवार,सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी स्वागत केले आहे.पुढील वाटचालीस सर्व यशस्वी विद्यार्थीनींना शुभेच्छा देण्यात आल्या.