मुल तालुका काँग्रेस कमेठी येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री याच्यां जयंती दिनाचा कार्यक्रम

32

मुल- राष्ट्रपिता महात्मा गांधी व पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीचा कार्यक्रम मुल तालुका कांग्रेस कमिटीच्या कार्यालयात साजरा करण्यात आला. महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेला चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा माजी जी. प.अध्यक्ष कांग्रेस नेते आणि महाराष्ट्र राज्य सहकारी सोसायटीचे नवनियुक्त गटसचिव सेवायोजन सहकारी सोसायठी पुणे चे सदस्य संतोषसिंह रावत यांचे हस्ते माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार, उपसभापती संदीप कारमवार, संचालक तथा विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र कन्नमवार, संचालक किशोर घडसे, कांग्रेस ओबीसी सेलचे अध्यक्ष गुरुदास चौधरी, राजू मारकवार,महिला कांग्रेस अध्यक्षा रुपाली संतोषवार, नगर सेविका ललिता फुलझेले, सामाजिक कार्यकर्ते विवेक मुत्यालवार, सुरेश फुलझेले, माजी उपाध्यक्ष चंदू चतारे, गणेश रणदिवे, सहकारी सोसायटीचे सचिव संजय बददेलवार, यांचे सह तालुका व युवक कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बळकटी करणासाठी तालुका व शहर कांग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आताच कामाला लागावे असे आव्हान बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी यानिमित्ताने कार्यकर्त्यांना केले.