एक दिवसीय खादी महोत्सवाचे उदघाटन गांधी जयंतीच्या दिवशी ग्राहकांना 10 टक्के विशेष सूट

35

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून मुल येथील नाग विदर्भ चरखा संघाच्या वतीने संचालित खादी भांडार कडून एक दिवसीय खादी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, या महोत्सवानिमित्त खादी कापड खरेदीवर आज गांधी जयंतीच्या दिवशी ग्राहकांना 10 टक्के विशेष सूट देण्यात आली आहे,

या महोत्सवाचे उदघाटन चंद्रपूर जिल्हा सहकारी बोर्ड चे अध्यक्ष प्राचार्य ते क कापगते यांच्या हस्ते करण्यात आले,

नगर परिषद चे उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, खादी भांडार कचेरी प्रमुख दादाजी बनकर, सामाजिक कार्यकर्ते किशोर कापगते यांची प्रमुख उपस्थिती होती.

सर्वप्रथम महात्मा गांधींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून गांधीजींचे स्मरण करण्यात आले.

खाडी भांडार चे सहमंत्री राजू गुरनुले, व्यवस्थापक गुरुदास बोरकर, मुकेश देवगडे,संदीप मंगाम, मिथुन मोहूर्ले यांनी महोत्सव यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न चालवले आहेत, खादी खरेदीवर मिळणार असलेल्या 10 टक्के सुटीचा लाभ घेत जास्तीस्त जास्त खरेदी करून महोत्सव यशस्वी करण्याचे आवाहन मुल खादि भांडार च्या वतीने करण्यात आले आहे.