ध्येय निश्चित करा, यश तुमच्या हातात – जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले यांचे प्रतिपादन

40

मूल : येथे तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण शालेय विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून जाऊ नये. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करावे. त्यादृष्टीने जिद्द, परिश्रम केल्यास यश निश्चित मिळेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा सौ संध्या गुरनुले यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संध्या गुरनुले व मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामान्य ज्ञान व वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस बक्षीस वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. मुल येथील कन्नमवार सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पंचायत समितीचे सभापती श्री चंदू मारगोणवार यांची उपस्थिती होती तर मंचावर तहसीलदार श्री रवींद्र होळी, गटविकास अधिकारी श्री मयुर कळसे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री सिद्धार्थ मेश्राम, ठाणेदार श्री राजपूत आदींची यावेळी उपस्थिती होती. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले यांच्या हस्ते सामान्य ज्ञान व वक्तृत्व स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
पुढे संध्याताई गुरनुले म्हणाले, जीवनात कुठली अशक्य बाब नाही. त्यासाठी ध्येय निश्चित करावे लागते. सोबत मेहनत, जिद्दची जोड दिल्यास यश आपल्या पदरी पडेल. एकदा अपयश आले म्हणून विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नये. अपयश हेच यशाचे गमक आहे. जिद्द आणि परिश्रम घ्यावेत, जिद्द परिश्रमाने निश्चितपणे आपल्या पदरी यश मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सामान्य ज्ञान स्पर्धा गट अ… प्रथम- पार्थ संतोष चित्तलवर… द्वितीय- पार्थ संजय नागुलवर… तृतीय- संकेत कामदेव कोल्हे
सामान्य ज्ञान स्पर्धा गट ब… प्रथम- गोकुल शामराव मोहूर्ले… द्वितीय- प्रियंका सुरेश गाडीवर… तृतीय- खुशाल वामन मानेवार…वक्तृत्व स्पर्धा…प्रथम-धनश्री मिलिंद हेडाव… द्वितीय- अनधा मनोज अहिरकर… तृतीय- नंदिनी रेवनाथ वालदे विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळविले असून त्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.