अनुचित जाती जमातीतील शेतक-यांनी कृषी योजनाचा लाभ घ्यावा :सभापती श्री चंदू मारगोणवार

29

मूल तालुका पंचायत समिती कृषी विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना तर अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना सन २०२१-२२ करीता अर्ज मागविण्यात येत आहेत.

या योजनेमधून शेतकऱ्यांना नविन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, विज कनेक्शन, विद्युत पंप संच, शेत तळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण व सूक्ष्म सिंचन याबाबींचा पॅकेज स्वरुपात लाभ देण्यात येणार आहे. नविन विहीरींचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या नावे कमित कमी ०.४० हेक्टर (एक एकर) क्षेत्र असणे आवश्यक आहे. इतर बाबींसाठी ०.२० हेक्टर ( अर्धा एकर) क्षेत्र असणे आवश्यक आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी खाते उताऱ्यासह सर्व ७/१२ उतारे, सक्षम अधिकाऱ्याचा जातीचा दाखला, रु. १,५०,००० च्या आतिल उत्पन्नाचा दाखला, आधारकार्ड झेरॉक्स, बॅंक पासबुक झेरॉक्स, ग्रामसभा ठराव तसेच नविन विहिर लाभ घेण्यासाठी यापूर्वी शासकीय विहीर योजनेचा लाभ घेतलेला नसावा.