कृषि दूताकडुन ई-पीक पाहणीचे प्रात्यक्षिक थेट शेतक-यांच्या बांधावर

60

मूलः-  महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी ई-पीक नोंदणी बंधनकारक केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतक-यांना यासंदर्भात विविध समस्यांना समोरे जावे लागत आहे.ही बाब लक्षात घेता तालुक्यातील गडीसुर्ला येथील कृषी महाविद्यालय गडचिरोली येथे बिएसी कृषी अंतीम वर्षाला शिक्षण घेणारा मयुर विलास ढोले याने थेट शेतक-यांच्या बांधावर जाऊन ई -पीक पाहणीचे प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच शेतक-यांची पीक पेराची नोंद करून दिली. शेतक-यांनी मोबाईलवर ई-पीक अॅप कसा हाताळावा व माहिती कशी भरावी याबदल सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांने स्वतःच्या मोबाईलद्वारे 20 शेतक-यांच्या पिकाची नोंद करून दिली. नोंद करताना आलेल्या अडचणी सोडवून प्रशासनास सहकार्य करणा-यास तत्पर राहील असे सांगितले. मयूर ने प्रत्यक्ष शेतक-यांशी संवाद साधून उपयुक्त माहिती दिल्याने व ई-पीक ची नोंद करून दिल्याने शेतक-यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी गावातील नागरीक वासुदेव निकुरे,बबन चैधरी,विलास महाडोळे,रविंद्र कोकोडे,विनोद कावळे,विनोद ढोले,रोहित निकुरे,हरिचंद्र लेनगुरे,सागर नागोसे इत्यादी शेतक-यांनी ईपीक नोंदणीत सहभाग घेतला