नउु वषीय चिमुकलीचा मृत्यू

54

नउु वषीय चिमुकलीचा मृत्यू
मुल:- तालुक्यातील पिपरी दिक्षीत येथील नऊ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना 3 वाजताच्या सुमारास घडली.मृतक मुलीचे नाव वैष्णवी मनोज ढोंगे रा.पिपरी दिक्षीत असे आहे. सविस्तर वृत्त असे की, पिपरी दिक्षीत गावातील रस्तावर एम एच 34 बि एफ 1614 ट्रक्टर उभी होती. त्या ट्रॅक्टरवर व बाजूला गावातील चिमुकली मुलं मुली खेळत असताना टॅªक्टरचा हॅन्ड ब्रॅंक लावून नसल्याने व रिव्हर्स घेर अचानक पडल्याने ट्रक्टर मागे जायला लागल्याने चिमुकली मुलं मुली खाली उतरले. मात्र वैष्णवी मनोज ढोंगे हि खाली उतरताना चाकात आल्याने तिने जागीच मृत्यू झाला.
 एका चिमुकलीचा नाहक बळी गेला आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच मुल पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.