Navy Recruitment 2021 : भारतीय नौदलात 358 पदांवर भरती

39

नवी दिल्ली, 27 सप्टेंबर : भारतीय नौदलाने वेगवेगळ्या पदांवर भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्या पदांमध्ये टोपास (TOPASS), स्‍टोअर कीपर, क्रेन ऑपरेटर, सुपरीटेंडंट (स्‍टोअर), Lascar-I आणि फायरमॅन यांचा समावेश आहे. 24 सप्टेंबरपासून या पदांवर अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, 25 ऑक्टोबर 2021पर्यंत इच्छुक यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. भारतीय नौदलाने (Indian Navy) या पदांवर भरतीची जबाबदारी स्टाफ सिलेक्शन कमिशनकडे (SSC) सोपवली आहे. अशी शक्यता आहे, की कमिशनतर्फे 2022 च्या जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात परीक्षा आयोजित करण्यासंदर्भातली तयारी सुरू आहे. ही परीक्षा कम्प्युटरवर घेतली जाईल आणि त्यात जनरल इंटेलिजन्स, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड, इंग्लिश लँग्वेज (मूलभूत ज्ञान) आदींशी संबंधित प्रश्न विचारले जातील.

कमिशनतर्फे या भरतीसंदर्भातलं सविस्तर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. (Navy Recruitment 2021) हे ही Latest IT Jobs: ‘या’ टॉप 4 IT कंपन्यांमध्ये फ्रेशर्ससाठी नोकरीची मोठी संधी भरतीसंदर्भातली महत्त्वाची माहिती पदाचं नाव : TOPASS पद कोड : NR17121 उम्र सीमा : 1 जानेवारी 2021 रोजी 18 वर्ष ते 25 वर्षांपर्यंत. वेतनमान : लेव्हल-1 शिक्षण : मॅट्रिक्युलेशन, 10वी पास/ समकक्ष परीक्षा. व्हेकन्सी : 4 पदाचं नाव : स्टोअर कीपर पद कोड : NR17221 उम्र सीमा : 1 जानेवारी 2021 रोजी 18 वर्ष ते 25 वर्षांपर्यंत.

वेतनमान : लेव्हल-2 शिक्षण : हायर सेकंडरी व्हेकन्सी : 161 पदाचं नाव : फ्लोटिंग क्रेन पायथन आणि मॅमथसाठी क्रेन ऑपरेटर पद कोड : NR17321 उम्र सीमा : 1 जानेवारी 2021 रोजी 18 वर्ष ते 25 वर्षांपर्यंत. वेतनमान : लेव्हल-4 शिक्षण : मॅट्रिक्युलेशन, 10वी पास/ समकक्ष परीक्षा. व्हेकन्सी : 3 पदाचं नाव : सुपरिटेंडंट (स्टोअर) पद कोड : NR17421 उम्र सीमा : 1 जानेवारी 2021 रोजी 18 वर्ष ते 25 वर्षांपर्यंत. वेतनमान : लेव्हल-4 शिक्षण : पदवीधर व्हेकन्सी : 26 पदाचं नाव : Lascar-I पद कोड : NR17521 उम्र सीमा : 1 जानेवारी 2021 रोजी 18 वर्ष ते 25 वर्षांपर्यंत.

वेतनमान : लेव्हल-1 शिक्षण : मॅट्रिक्युलेशन, 10वी पास/ समकक्ष परीक्षा. व्हेकन्सी : 142 पदाचं नाव : फायरमॅन पद कोड : NR17621 उम्र सीमा : 1 जानेवारी 2021 रोजी 18 वर्ष ते 25 वर्षांपर्यंत. वेतनमान : लेव्हल-1 शिक्षण : मॅट्रिक्युलेशन, 10वी पास/ समकक्ष परीक्षा. व्हेकन्सी : 22 अर्ज कुठे करायचा? स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या https://ssc.nic.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करायचा आहे. महत्त्वपूर्ण तारखा : ऑनलाइन अर्ज सादर करण्याचा कालावधी : 24-09-2021 ते 25-10-2021 अर्ज करण्याचा शेवटचा दिवस : 25-10-2021 (रात्री 23.30 वाजेपर्यंत) ऑनलाइन शुल्क भरण्याचा अंतिम दिवस : 28-10-2021 (रात्री 23.30 वाजेपर्यंत) ऑफलाइन चलान जनरेट करण्याचा शेवटचा दिवस : 28-10-2021 (दुपारपर्यंत) चलनाच्या माध्यमातून शुल्क भरण्याचा अंतिम दिवस : 01-11-2021 कम्प्युटर आधारित परीक्षेचा संभाव्य महिना : जानेवारी/फेब्रुवारी 2022