पाटबंधारे विभाग नागपूर इथे ‘या’ पदांसाठी होणार पदभरती; विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये मिळणार संधी

60

नागपूर, 20 सप्टेंबर: पाटबंधारे विभाग (Nagpur Irrigation Department) नागपूर इथे काही जागांसाठी लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Nagpur Irrigation Department Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. वकील या पदांसाठी ही भरती (Nagpur latest jobs) असणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2021 असणार आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर अंतर्गत वकिलांच्या नियुक्तीबाबत विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, सिंचनभवन, नागपूर कार्यालयाकडुन नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा व यवतमाळ या जिल्हयामधील विविध दिवाणी न्यायालयामधील तसेच मोटार अपघात न्यायाधिकरण, कामगार न्यायालय, औद्योगिक न्यायालय, महाराष्ट्र प्रशासकिय न्यायाधिकरण नागपूर, महाराष्ट्र भुमिसंपादन, पुर्नवसन आणि पुर्नस्थापना प्राधिकरण नागपूर, व उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ समोरील न्यायालयीन प्रकरणं चालवण्यासाठी नियुक्ती करण्यात येत आहे.

Nagpur Irrigation Department Recruitment 2021

या पदांसाठी भरती वकील (Advocate) हे 10वी उत्तीर्ण उमेदवारांना Railway देणार ट्रेनिंग; आज शेवटची तारीख; लगेच करा अर्ज शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वकील (Advocate) – या पदभरतीसाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदाशी कायद्याचं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अर्जदार वकिलीचा अभ्यास करत असावा. उमेदवारांना सिव्हिल, क्रिमिनल, लेबर आणि इंडस्ट्रियल विभागातील प्रॅक्टिसचा किमान 5 वर्षांचा अनुभव असावा. अर्जदाराने चिंता बारद्वारे जारी केलेल्या सराव कालावधीचे प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे. सध्याच्या पॅनलवरील उमेद्वारांनीही नव्यानं अर्ज सादर करणं अनिवार्य असणार आहे. या ठिकाणी असणार नोकरी नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ या विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये नोकरीचं ठिकाण राहणार आहे. यासाठी उमेदवार निवडले जाणार आहेत. अर्ज पाठवण्याचा पत्ता अधीक्षक अभियंता, नागपूर पाटबंधारे मंडळ, नागपूर सिंचन सेवा भवन, दुसरा माला, सिव्हील लाईन, नागपूर – 440001 अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी edvide@gmail.com निवड प्रक्रिया या पदभरतीसाठी मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यासाठी उमेवारांनी मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची वेळ आणि पत्ता उमेदवारांना शॉर्टलिस्ट करण्यात आल्यानंतर कळवण्यात येणार आहे.

JOB TITLE Nagpur Irrigation Department Recruitment 2021
या पदांसाठी भरती वकील (Advocate)
शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी संबंधित पदाशी कायद्याचं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. प्रॅक्टिसचा किमान 5 वर्षांचा अनुभव असावा
नोकरीचं ठिकाण नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ
अर्ज पाठवण्याचा पत्ता अधीक्षक अभियंता, नागपूर पाटबंधारे मंडळ, नागपूर सिंचन सेवा भवन, दुसरा माला, सिव्हील लाईन, नागपूर – 440001
निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड
शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://wrd.maharashtra.gov.in/ या लिंकवर क्लिक करा