शिक्षक भारती परिवार शाखा मुल तर्फे कोविड योद्धांचा सन्मान

64

शिक्षक भारती परिवार शाखा मुल तर्फे कोविड योद्धांचा सन्मान
आज दिनांक 19 सप्टेंबर 2021 रोज रविवारला शिक्षक भारती परिवार मुल तर्फे पंचायत समिती मुल येथे कोरोना काळात कोविड सेंटर कर्मवीर महाविद्यालय मुल येथे कार्य करणाऱ्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला .

 

या कार्यक्रमाचे उद्घाटन मुल पंचायत समितीचे सभापती आदरणीय चंदुभाऊ मारगोनवार साहेब, प्रमुख मार्गदर्शक आदरणीय प्राध्या .राजेंद्र झाडे सर,अध्यक्ष आदरणीय भाऊराव पत्रे सर विभागीय अध्यक्ष शिक्षक भारती, विशेष अतिथी सन्मा . संजय खेडीकर सर राज्य संयुक्त कार्यवाह, प्रमुख पाहुणे सन्मा . सुरेश डांगे सर जिल्हा अध्यक्ष शिक्षक भारती प्राथ ., सन्मा . भास्कर बावणकर सर जिल्हा अध्यक्ष शिक्षक भारती माध्य ., सन्मा . महेश भगत सर जिल्हा अध्यक्ष विशेष शाळा, सन्मा . पुंडलिक देशमुख सर जिल्हा अध्यक्ष शिक्षक भारती गडचिरोली, सन्मा . पुरूषोत्तम टोंगे सर कार्याध्यक्ष शिक्षक भारती माध्य . सन्मा . गजेंद्र कोपूलवार साहेब के . प्र . सन्मा . धनराज रडके सर मुख्याध्यापक नवभारत विद्या मुल, सन्मा . रमेश दांडेकर सर, सन्मा . रावन शेरकुरे सर, सन्मा .विलास फलके सर संघटक, सन्मा . अमरदिप भुरले सर कार्याध्यक्ष गडचिरोली, यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला .

 

कोविड योद्धामध्ये उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व इतर कर्मचारी, पोलीस विभागातील पोलीस कर्मचारी, आशा वर्कर, विशेष शाळातील शिक्षक कर्मचारी, मुल पंचायत समितीतील जि.प.प्राथमिक शिक्षक व शिक्षिका, कर्मवीर महाविद्यालय मुल येथील प्राध्यापक, आणि नव भारत विद्या . मुल येथील शिक्षक व शिक्षिकांचा सन्मापत्र देऊन सन्मान व गौरव करण्यात आला .

या कार्यक्रमासाठी जिल्हा सरचिटणीस नंदकिशोर शेरकी, मुल तालुका अध्यक्ष क्रिष्णा बावणे, विशेष शाळाचे डॉ . तागडे सर, नवभारत विद्या . मुलचे मुंडरे सर, तालुका सचिव छबन कन्नाके, कोषाध्यक्ष कुमदेव कुळमेथे, संघटक विजय मडावी , सावली तालुका अध्यक्ष किसन गेडाम, प्रसिद्धी प्रमुख विजय मिडपल्लीवार, विनोद धानोरकर सर यांनी मोलाचे सहकार्य केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश डांगे सर यांनी तर सुत्रसंचलन नंदकिशोर शेरकी यांनी केले .