घरगुती बाप्पाला भावपूर्ण निरोप,माझी वसुंधरा अंतर्गत कृत्रिम तलाव तयार करण्यात आले.नागरीक प्रतिसाद देत आहे

45

घरगुती बाप्पाला भावपूर्ण निरोप, माझी वसुंधरा अंतर्गत कृत्रिम तलाव तयार करण्यात आले.नागरीक प्रतिसाद देत आहे

दहा दिवस मुक्काम केल्यानंतर कोरोनाचे नियम पाळत अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाचं वाजत गाजत विसर्जन केलं जात आहे. पुढच्या वर्षी लवकर या म्हणत बाप्पाला निरोप दिला जात आहे. मात्र, कोविडच्या नियमांमुळं यंदाही विसर्जन मिरवणुकीचा उत्सव गर्दी टाळूनच करावा लागत असल्याने भक्तांचा काहीसा हिरमोड झालेला पहायला मिळाला. किमान पुढच्या वर्षीतरी अशी परिस्थिती नसावी असच मागणं यंदा बाप्पाकडे गेलं आहे. दरम्यान, घरगुती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला आहे.

मूल मध्ये पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर अनेकांचा भर
दहा दिवसांपूर्वी वाजत गाजत घरोघरी विराजमान झालेल्या बाप्पाला आज भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जातोय. मूल मध्ये पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर अनेकांचा भर दिसत असतांनाच आज सकाळपासूनच घरगुती गणपती विसर्जनसाठी गणेश मूर्ति संकलन केंद्रावर गणेशभक्त दाखल होतायत. बाप्पाची मनोभावे आरती करत कृत्रिम तलावात डुबकी देत मूर्ती दान केल्या जातायत.

गणेश विसर्जन कुंड माझी वसुंधरा अभियानांतर्गत मूल शहरात  कृत्रिम तलावांची निर्मिती मूल नगरपरीषदेच्या वतीने करण्यात आली. या  तलावात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून सामान्य मूल यांना बाप्पाचे विसर्जन हे थेट दारातच करता यावं या उद्देशातून ह्या संकल्पना आहे ती निर्माण करण्यात आली आहे.घरगुती बाप्पाला भावपूर्ण निरोप,माझी वसुंधरा अंतर्गत कृत्रिम तलाव तयार करण्यात आले.नागरीक प्रतिसाद देत आहे