Aadhaar Card: आधार नंबर विसरलात तर चिंता सोडा; ऑनलाईन माहिती मिळविण्याचा सर्वात सोपा उपाय

63

आधार कार्ड सध्याच्या घडीला सर्वात महत्वाचे कागदपत्र बनले आहे. सर्वाधिक आता आधार कार्डचाच (aadhar card) वापर केला जातो. अशावेळी अनेकदा ते कुठेतरी विसरले जाते किंवा हरवते. या आधार कार्डामध्ये एक युनिक १२ आकडी कोड असतो. त्याला आधार नंबर किंवा युआयडी म्हणतात. (How to get Lost aadhar card number, see all online steps)

हा नंबर खूप महत्वाचा असतो. कारण हा नंबर अनेक ठिकाणी स्वीकारला जातो. कोणत्याही व्यक्तीकडे आधार कार्डची कॉपी नसेल तर नंबरचा वापर केला जातो. तसेच या नंबरद्वारे तुम्ही आधार कार्ड डाऊनलोड करू शकता. (Aadhaar Card tips and tricks.)

परंतू जर तुमचे आधार कार्ड हरविले किंवा नंबरच लक्षात राहिला नाही तर काय कराल? असे अनेकांच्या बाबतीत होते. तुमचे आधार परत मिळविण्यासाठी सर्वात सोपी पद्धत आहे. यासाठी तुम्हाला फक्त तीन गोष्टी लागणार आहेत. तुमचा आधारशी जोडलेला मोबाईल नंबर किंवा मेल आयडी, मोबाईल नंबर एसएमएस सुविधेसह अॅक्टिव्ह असावा, इंटरनेट कनेक्टिव्हिटी असावी.

काय करावे लागेल, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

  1. कोणत्याही वेब ब्राऊझरवर जाऊन ‘https://resident.uidai.gov.in/’ उघडावे.
  2. माय आधार (MyAadhaar) बटनावर क्लिक करावे.
  3. खाली स्क्रोल करून आधार सर्व्हिस सेक्शन शोधावा. यानंतर ‘रिट्रीव लॉस्ट किंवा फरगॉटन EID/UID’ वर क्लिक करा.
  4. तुम्हाला ओटीपी येण्यासाठी ओटीपीवर क्लिक करा आला की तो आणि कॅप्चा टाकून लॉगिन बटनावर क्लिक करा
  5. यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर किंवा एनरोलमेंट नंबर तुमच्या रजिस्टर असलेल्या फोन नंबर किंवा मेल आयडीवर मिळून जाईल.