15 वर्षाचा रहिवासी प्रमाणपत्र / निवास स्थान प्रमाणपत्र

81

रहिवासी प्रमाणपत्र / निवास स्थान प्रमाणपत्र

व्यक्ती कोणत्या राज्याचा रहिवासी आहे.हे सिद्ध करण्यासाठी रहिवासी प्रमाणपत्राची आवश्यकता असते. जरी व्यक्तीचे रेशनकार्ड, मतदानकार्ड, आधारकार्ड, ही कागदपत्रे व्यक्ती राहत असलेल्या ठिकाण दर्शवत असले तरी रहिवासी प्रमाणपत्र हे रहिवासी दर्शवणारे प्रमाणित अंतिम प्रमाणपत्र असते.

लायसेन्स, नोकरी, संपत्ती, व्यवसाय नोदणी इ.साठी याची आवश्यकता असते.रहिवासी प्रमाणपत्र हे केवळ प्रत्येक राज्य तेथील राहणाऱ्या नागरिकांना देत असल्याने एक व्यक्ती दोन वेगवेगळ्या राज्यातील रहिवासी प्रमाणपत्र काढण्यास पात्र नसतो. तसे करणे कायद्याने गुन्हा ठरतो.

प्राप्तीसाठी आवश्यक कागदपत्रे

  • तलाठी रहिवासी दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • रेशनकार्ड झेरॉक्‍स

रहिवासी प्रमाणपत्रामध्ये गाव पातळीवर तलाठी यांचे रहिवासी प्रमाणपत्र मराठी मध्ये तहसील कार्यालयाकडून दिले जाणारे डोमोसाईल / रहिवासी प्रमाणपत्र व जिल्हाधिकारी कार्यालयातून /मार्फत दिले जाणारे राष्ट्रियत्व प्रमाणपत्र असे कामानुसार प्रमाणपत्र वापरता येतात.केंद्रीय नोकर भरतीसाठी महाराष्ट्र शासनाच्या नोकरीकरिता डोमासाईल सर्टिफिकेट आवश्यकता असते.

मात्र महा ई सेवा केंद्रात ही सेवा ऑनलाईन उपलब्‍ध आहे.