सुशी दाबगाव व जाम तुकुम रोडलगत ईशमाच संशयास्पद मृत्यू

31

सुशी दाबगाव व जाम तुकुम रोडलगत ईशमाच संशयास्पद मृत्यू

पोंभूर्णा पोलिस स्टेशन हदितील घटना
प्रतिनिधी सुशी दाबगावं
मुल तालुक्यातील सुशी दाबगावं पासून तीन किमी अंतरावर मुल पोंभुर्णा रोड लगत किसन वाळके यांच्या शेताजवळ आज सकाळचे सुमारास एका अज्ञात इस्माचे प्रेत आढळल्याने गावात व गाव परिसरात मोठी खळबळ उडाली असून घात आहे की घातपात हे अजून कळलेले नाही मात्र नागरिकात घातपात झाला असावा अशी चर्चा पसरली आहे.


फिरायला गेल्याल्या युवकांना कसरतीच्या दरम्यान माहिती होताच भांबावलेल्या युवकांनी गाव प्रतिनिधींना दिली त्यांनी घटना स्थळ गाठून सुशी दाबगावं व जामखुर्द मधोमध असलेल्या रस्त्याच्या बाजूला च एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह असल्याचं सांगण्यात आले त्यानुसार पोंभूर्णा येथील पोलिस प्रशासनाची चमू घटना स्थळ गाठून पंचनामा करण्यात आला मात्र अजून पर्यंत मयत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलिस प्रशासनास यश मिळाले नसून पुढील तपास ठाणेदार जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक ओलालवार करीत आहेत.