गुन्हा दाखल होताच बल्लारपूरातील मुख्य सूत्रधार फरार

77

 

गुन्हा दाखल होताच बल्लारपूरातील मुख्य सूत्रधार फरार

अटकेसाठी पोलिसांचे आठ पथक गठित

चंद्रपूर:-

जिल्हा परिषदेत नोकरी लावून देण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीने बनावट आदेश तयार केल्या प्रकरणी बुधवारी गुन्हा दाखल होतात बल्लारपूरातील मुख्य सूत्रधार आरोपी ब्रिजेशकुमार बैधनाथ हा फरार झाला आहे

दरम्यान रामनगर पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी आठ पथकांचे पथक गठित केले आहे . आरोपी हा परप्रांतात पळाल्याची शक्यता आहे . चंद्रपुरातील सुरजनाथ कोडापे आणि राजुरा येथील नितीन सदाशिव घोरपडे यांनी बनावट स्वाक्षरीने लाखोनि गंडविल्याची तक्रार जिल्हा परिषदेकडे केल्यानंतर प्रशासनानेही कागदपत्र सह तक्रार दाखल केली आहे .गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाल्याचे कळताच वरिष्ठांच्या आदेशानुसार रामनगर पोलिसांनी आठ जणांचे विशेष पथक तयार केले . या पथकाने शुक्रवारपासून आरोपीचा शोध सुरू केला आहे . जिल्हा परिषदेमध्ये कनिष्ठ सहाय्यक व परिचर पदाची भरती नसताना आरोपीने बनावट जाहीरातीच्या आधारावर लाखोची रक्कम घेऊन नोकरीसाठी पात्र ठरविले आणि तथा तसा आदेशही त्यांना दिला . या युवकांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अभियंता अधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांना आदेश दाखविल्यानंतर हा बनावट प्रकरण उघडकीस आला .