ध्येयपुर्तीसाठी परीश्रम आणि त्यागाची वृत्ती जोपासा – जि.प.अध्यक्षा संध्याताई गुरनुले

45

ध्येयपुर्तीसाठी परीश्रम आणि त्यागाची वृत्ती जोपासा – जि.प.अध्यक्षा संध्याताई गुरनुले

डाॅ.यशवंत युवा मंच आणि माळी समाज महिला मंडळ व बचत गटाच्या संयुक्त विद्यमाने

यशाचे शिखरे गाठण्यासाठी विद्याथ्र्यांनी प्रयत्नवादी राहून उराशी बाळगलेल्या ध्येयाची पुर्ती करण्यासाठी परीश्रम आणि त्यागाची वृत्ती जोपासावी असे आवाहन करतांना जि.प.अध्यक्षा संध्याताई गुरनूले यांनी एका समाजाच्या आधारे राजकारण करणे शक्य नसून इतर समाजाच्या सहकार्याशिवाय राजकारणात यश संपादन करता येत नाही. असा विश्वास व्यक्त केला. माळी महासंघ, अ.भा.महात्मा फुले समता परीषद, बहुउद्देशिय विकास संस्था, समाजोत्थान मंडळ, क्रांतीज्योती नागरी सहकारी पत संस्था, डाॅ.यशवंत युवा मंच आणि माळी समाज महिला मंडळ व बचत गटाच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या समाजातील गुणवंत विद्यार्थी, कोरोना यौध्दा व नवनिर्वाचित सरपंच यांच्या गौरव व सत्कार समारंभाचे उदघाटन करतांना संध्याताई गुरनुले बोलत होत्या.

स्थानिक कर्मवीर कन्नमवार सभागृहात संपन्न झालेल्या समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजीक कार्यकर्ते प्रा. रामभाऊ महाडोरे होते. यावेळी उत्पादन शुल्क व दारूबंदी विभागाचे उपायुक्त किरण गावतुरे, विस्तारी अधिकारी जीवन प्रधान, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोनबले, निवृत्त प्राचार्य बंडु गुरनूले, समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते भिकाजी भेंडारे, सामाजीक कार्यकर्ते हसन वाढई, डाॅ. पद्माकर लेनगुरे, पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक येरमे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रारंभी जि.प.अध्यक्षा संध्याताई गुरनुले यांनी समाजभुषण महात्मा ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन आणि दिप प्रज्वलन केले. यावेळी कला निकेतनच्या विद्यार्थीनींनी स्वागत गीत सादर केले. यावेळी उपस्थित बंडु गुरनूले, डाॅ. पद्माकर लेनगुरे, प्रा. विजय लोनबले, किरण गावतुरे, जीवन प्रधान आदि मान्यवरांनी मार्गदर्शन करतांना गुणवंत विद्यार्थ्यांनी यापेक्षा अधिक प्रगती साधावी तर सरपंच मंडळींनी गावांच्या विकासासाठी कार्यरत राहावे.

असे मत व्यक्त केले. कार्यक्रमा दरम्यान इयत्ता दहावी, बारावी आणि शिष्यवृत्ती व नवोदय परिक्षेत गुणवंत ठरलेल्या तालुक्यातील माळी समाजातील ८५ विद्यार्थ्यांचा, कोरोना काळात कोरोना विरूध्द लढा पुकारणा-या समाजातील पोलीस, न.प. कर्मचारी, अन्य कर्मचारी व अधिकारी, शिक्षक, आशा वर्कर, परिचारीका, तालुक्यातील माळी समाजाच्या १८ नवनिर्वाचित सरपंच आणि समाजातील आदर्श शिक्षकांचा मान्यवरांचा हस्ते शाल, श्रीफळ, गौरव चिन्ह देवून सत्कार करण्यांत आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माळी महासंघाचे तालुका कार्याध्यक्ष गुरूदास चौधरी यांनी केले.

माळी महासंघाचे विभागीय सचिव गुरू गुरनूले यांनी संचालन आणि चतुर मोहुर्ले यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सुधीर नागोशे, राकेश ठाकरे, सौरभ वाढई, राकेश मोहुर्ले, रामा गुरनूले, संदीप वाढई, भाऊजी लेनगुरे, सुधीर वाडगुरे, प्रतीक गुरनुले, कुंदन वाढई, दिनेश गुरनुले, कल्याणी निकोडे, काजल गुरनुले आदी समाजाच्या युवकांनी परिश्रम घेतले.