PM Kisan Yojana | पुढील हप्त्यासोबत मिळवू शकता अडकलेला मागील हप्ता, जाणून घ्या कसा

88

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PM Kisan Yojana | प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेंतर्गत शेतकर्‍यांना वार्षिक 6 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. सरकार 2-2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यात हे पैसे चार महिन्यांच्या अंतराने खात्यात पाठवते.https://pmkisan.gov.in/Grievance.aspx

जर तुम्ही सुद्धा या योजनेसाठी पात्र आहात तर दोन पद्धतीने अर्ज करू शकता. सेल्फ रजिस्ट्रेशन, पेमेंटच्या स्थितीची तपासणी, आधारनुसार नावात सुधारणा करण्यासाठी पब्लिक इंटरफेस उपलब्ध केले आहेत. काही दिवसांपूर्वीच सरकारने 9वा हप्ता जारी केला होता.

 

अनेक शेतकरी असे आहेत ज्यांना 9व्या हप्त्याचे पैसे मिळू शकले नाही, म्हणजे त्यांचा हप्ता अडकला. या योजनेच्या नियमानुसार एखाद्या शेतकर्‍याचे लाभार्थींच्या यादीत नाव आले आहे आणि काही कारणामुळे हप्ता अडकला आहे तर पुढील हप्त्यासह मागील हप्त्याचे पैसे मिळू शकतात. मात्र यासाठी अट ही आहे की, शेतकर्‍याने आपल्या अर्जात शेतकर्‍यांनी आपल्या अर्जातील त्रूटींची दुरूस्ती केलेली असावी.

हप्ता न मिळण्याचे सर्वात मोठे कारण आधार नंबर, मोबाइल नंबर आणि बँक अकाऊंट नंबर चुकीचा असणे हे आहे.
अशावेळी तुम्ही पीएम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलद्वारे यास ठिक करू शकता.
यासाठी तुम्हाला लिंक https://pmkisan.gov.in/Grievance.aspx वर व्हिजिट करावी लागेल.तुमच्या समोर वेबसाइट उघडेल. यानंतर Register Query वर क्लिक करा.
याशिवाय मोबाइल अ‍ॅप (PMKISAN GoI) वर अर्जदाराला आधार नंबर अंतर्गत नाव सुधारण्याची सवलत मिळते.
अशा काही चुका आहेत ज्या अर्जात केल्याने हप्ता रोखला जातो.