शेतकरी कल्याण निधीमधून कॅन्सरग्रस्त महिला रुग्णाला चाळीस हजाराची तात्काळ मदत

78

 मुल-चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष कांग्रेसचे नेते तथा माजी जि. प.अध्यक्ष संतोषशिंह रावत यांनी अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली तेंव्हापासूनच संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील कँसरसारख्या दुर्धर आजारांनी त्रस्त असलेल्या गंभीर रूग्णांना,शेतकरी कल्याण निधी मधून उपचारासाठी आर्थिक मदत देण्याचे काम करीत आहे.

निराधार रुग्णांना बँकेचा आधार देण्याचे काम बँक करीत असून मुल नगरातील वॉर्ड नंबर १७ ताडाला रोडलगतच्या वस्तीतील लाभार्थी सौ. लक्ष्मी बंडू मोटघरे या महिलेला कँसर झाल्याचे लक्षात येताच बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी स्वतः रुग्णांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन चाळीस हजाराचा (४००००/-) चेक रुग्ण महिलेच्या हाती दिला.

याप्रसंगी तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती घनशाम येनुरकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष तथा बाजार समिती संचालक राकेश रत्नावर , गुरुभाऊ गुरनुले , बँकेचे अधिकारी नांदूजी मडावी, वॉर्डातील युवक कार्यकर्ते संदीप मोहबे, बबलू सय्यद, रणजित आकुलवार, बालू दुधे, धमा घडसे, बबलू आकबतनवार, अनिल निकोडे, माणिक भडके, गणेश कोडपे, सचिन वाळकोंडे, भाऊराव शंभरकर, बंटी वडलकोंडवार, संजय ननेवार, यांचेसह वॉर्डातील अनेक युवक कार्यकर्ते व लाभार्त्यांचे समाज बांधव उपस्थित होते. बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी निराधार रुग्ण महिलेला त्यांच्या घरी जाऊन आधार दिल्याबद्दल वॉर्डातील युवकांनी त्यांचे आभार मानले आहे.